पुणे

Party Raid Video Leak: पार्टीवरील कारवाईचे व्हिडीओ कोणी व्हायरल केले?; रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पोलिस आयुक्तांची घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

पुणे : खराडीतील पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्याची कारवाई संशयास्पद असल्याचे दिसून येते. मात्र, हा तपासाचा भाग आहे. तपासात ते निष्पन्न होईल. पोलिसांवर अजूनपर्यंत विश्वास आहे. दरम्यान, व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्रे कोणी व्हायरल केली? याबाबत सखोल तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बुधवारी (दि.30) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून केली, अशी माहिती डॉ. खेवलकर यांचे वकील अ‍ॅड. विजयसिंह ठोबरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Pune Latest News)

या पार्टी प्रकरणात खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोन तरुणींचा समावेश आहे. पार्टीत पोलिसांना अमली पदार्थसद़ृश्य पदार्थ मिळून आले आहेत. मात्र, डॉ. खेवलकर यांना अडकवण्यासाठी पोलिसांनी हेतूपुरस्सर ही कारवाई केली असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे.

रोहिणी खडसे यांनी सोमवारी (दि. 28) रात्री गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांची भेट घेऊन निस्पृहपणे तपास करण्याची विनंती केली. त्यानंतर खडसे यांनी बुधवारी (दि.30) दुपारी बारा वाजता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यामध्ये प्रामुख्याने तीन मागण्या केल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

डॉ. खेवलकर यांची व काही आरोपींची ओळख नव्याने झाली आहे. पार्टीमध्ये उपस्थित असलेले दोन जण अनाहूत होते. त्यांचा आमचा संबंध नव्हता. पाच दिवस त्यांनी आमच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. वारंवार फोन केला. इतर हॉटेल बंद असल्यामुळे आम्ही येथे आल्याचे सांगितले. ते आल्यानंतरच पोलिसांची रेड पडली. पोपटाणी आणि यादव यांनी केवळ तोंडओळख असताना पार्टीत आले. याबाबत संशय आहे. त्या मुलीशीं डॉक्टरांचा काही संबंध नाही. त्या कोठून आल्या, ते आम्हाला माहिती नाही. पोलिसांनी तपासणी करण्यापूर्वीच तरुणी पर्समधील अमली पदार्थ काढून पोलिसांच्या हवाली करणे हे अतिशय संशयास्पद आहे.

डॉ. खेवलकर यांचा आयफोन पोलिसांच्या ताब्यात आहे. जळगावचे तथाकथीत एक आमदार दावा करतात, त्यांच्या गुगल ड्राईव्हचा पासवर्ड माझ्याकडे आहे. तो पासवर्ड त्यांच्याकडे कसा गेला. ते मोबाईलमध्ये त्यांचे पर्सनल फोटोसुद्धा दाखवत होते. त्यामुळे आमचे फोटो कोणी व्हायरल केले ? तसेच, पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जर फक्त पोलिस उपस्थित होते; तर, त्यावेळेचे व्हिडीओ व छायाचित्रे कोणी व्हायरल केली? याबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी खडसे यांनी केल्याचे अ‍ॅड. ठोंबरे यांंनी सांगितले. या भेटीनंतर पोलिस आयुक्तांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT