पुणे

केशवनगर परिसरामध्ये रस्त्याचे काम संथगतीने; नागरिक व वाहनचालक त्रस्त

Laxman Dhenge

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : केशवनगर येथील रेणुकामाता रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे जड वाहने व पाण्याचे टँकर या रस्त्यावर अडकून पडत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या समस्येमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने या मार्गावर साडेबाराशे मीटर अंतराचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळी होण्यास मदत होणार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून हे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. यामुळे हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रशासनाने येथून जाणार्‍या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आश्यक होते. मात्र, तशी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने या रस्त्यावर जड वाहने अडकून पडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

केशवनगर येथील रस्ता रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना वर्दळीसाठी अडथळे येत आहेत. महापालिकेने हे काम तातडीने मार्गी लावावे; अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल.

– महादेव दंदी, आरपीआय (आठवले गट) अध्यक्ष, हडपसर विधानसभा मतदारसंघ

केशवनगर येथील रेणुकामाता मंदिर या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सुरू आहे. पुढील आठ दिवसांमध्ये हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

– मयूर जाधव, कनिष्ठ अभियंता, पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT