पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होवू नये यासाठी अनेक ट्रॅप लावले गेले; पण आम्ही ते उधळून लावले आहेत. आता पुन्हा एकदा ट्रॅप लावून मला आंदोलनातून बाहेर काढण्याचे पड्यंत्र सुरु आहे. दहा ते बाराजण मराठा आरक्षणाविरोधात बोलत आहेत. त्यांना पैसे आणि पद हवे आहेत त्यामुळे ते गोरगरीब मराठा समाजाच्याविरोधात बोलत आहेत. या मागील राजकीय नेत्यांनी संबंधितांना सूचना करावी. आता मराठा आरक्षणाविरोधात कोण बोलण्यास भाग पाडत आहेत त्यांचे नाव जाहीर करणार आहे, असे आव्हान मनोज जरांगे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
एकही पाउल चुललेले नाही
गेली पाच महिने मराठा आरक्षणासाठी २४ तास काम करत आहेत. आता श्रेयवादासाठी काहीच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे नेते आणि काही मराठा नेते आता श्रेय लाटण्याचे काम करत आहेत. ६० लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. गेल्या ६० वर्षांमध्ये असे घडले नाही. ते आता होत आहे. आमच्यावर कोणीही उपकार केलेले नाही. आतापर्यंत ३९ लाख मराठा समाजातील लोकांना कुणबी नोंद मिळाल्या आहेत. खोटे बोलून मराठा समाजातील गोरगरीबांचे नुकसान करु नका.
२००१ च्या कायदानुसार कुणबी नोंद होणे गरजेचे आहे. मराठ्यांना या कायदानुसार आरक्षण मिळाले नाही तर सर्वांचेचे ओबीसीचे आरक्षण रद्द होईल. कुणबी ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांनी आता जात प्रमापणत्रासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यांनी प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आतापर्यंत ३९ लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाली आहेत. ५७ लाख नोंदी मिळाल्या हे अंतिम सत्य आहे. तर ५४ लाख नोंदी सापडलेल्या परिवारांनी अर्ज करण गरजेंच आहे अस ते म्हणाले.
भुजबळांच्या दबावामुळे सरकार अधिसूचना काढत नव्हतं
छगन भुजबळ यांच्या दबावामुळे सरकार अधिसूचना काढत नव्हते.आम्ही वाशीत गेल्यानंतर सरकारने अधिसूचना काढल्याचा आराेप जरांगेंनी केला. माझ्या बदनामीसाठी काहींनी सुपारी घेतली आहे. आता मराठा आरक्षण मिळणार असत्याने काही लोकांची दुकान चालणार नाहीत म्हणून माझ्या विरोधात ट्रॅप लावले जात आहेत पण मी अशांना घाबरत नाही. मी मॅनेज होत नाही ही अनेकांची पोटदुखी आहे. आरक्षणात अडथळे आणणारे सरकार आणि विरोधी पक्षातले कोण आहेत त्यांची नावे आम्हाला माहिती आहेत ती जाहीर करणार असल्याचा इशारा देखील जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
हेही वाचा :