पुणे

Rinku Bansode Murder : बारामतीत ऊर्जा भवनामध्ये रिंकू बनसोडेंना श्रद्धांजली

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : मोरगाव (ता. बारामती) येथील महावितरणच्या उपकेंद्रात सेवेवर असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे यांचा चाकूने वार करत निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (दि. 25) घडली. गुरुवारी (दि. 25) येथील ऊर्जा भवनामध्ये सर्व अधिकारी- कर्मचार्‍यांनी शोकसभा घेत घटनेचा निषेध केला, तसेच बनसोडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. वीज बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या अभिजित दत्तात्रय पोटे याने कोयत्याने हल्ला करत बनसोडे यांचा खून केल्याची घटना बुधवारी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली होती. समाजमन सुन्न करणार्‍या या घटनेत एका महिला कर्मचार्‍याचा हकनाक बळी गेला.

मूळच्या लातूर शहरातील रहिवासी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे या दहा वर्षांपूर्वी महावितरणच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. गेल्या 10 वर्षांपासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला असून, त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दहा दिवसांची सुटी संपवून त्या बुधवारीच कामावर रुजू झाल्या होत्या. परंतु हाच दिवस त्यांच्यासाठी काळ बनला. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचार्‍यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचार्‍यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT