पुणे

दबाव झुगारा, दोषींवर कारवाई करा!..अन्यथा आंदोलन : आ. धंगेकर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची भेट घेतली. या वेळी कोणत्याही दबावाला बळी पडू नका, चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. धंगेकर म्हणाले, चौकशी समितीने लवकरात लवकर तपास करावा. या प्रकरणात दोषींना शिक्षा व्हायला हवी. डॉ. अजय तावरे यांच्यावर यापूर्वीही अनेक आरोप झाले आहेत. किडनी रॅकेट प्रकरणात त्यांचे नाव आले होते. निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात आली होती. मात्र चौकशीचे काय झाले हे माहिती नाही. डॉ. तावरे हे मंत्र्यांच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप धंगेकर यांनी केला.

…अन्यथा आंदोलन करणार

ललित पाटील प्रकरणानंतरही सरकारला जाग आली नाही. आता रक्त नमुना बदलल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. डॉ. दिलीप म्हैसेकर वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी अनेकदा चुकीच्या लोकांना पाठीशी घातले आहे.. चौकशी समितीने लवकरात लवकर अहवाल द्यायला हवा. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन यांच्याकडून होत असलेल्या पाठराखणीकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT