पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांच्या काळात झालेल्या महत्त्वपूर्ण कामांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 25) झाले. माजी खासदार संजय काकडे यांनी ही पुस्तिका तयार केली असून, तिच्या साठ हजार प्रतींचे पुणे लोकसभा मतदारसंघात वाटप करण्यात येणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 10 हजार पुस्तिकांचे स्वतः वाटप करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही काकडे यांच्याकडून ही पुस्तिका भेट देण्यात आली.
या पुस्तिकेच्या प्रकाशनाला माजी मंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक राहुल भंडारे, बापू कर्णे गुरुजी, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, राजेंद्र शिळीमकर, अर्चना पाटील, सुशील मेंगडे, मुकारी आलगुडे, ज्ञानेश्वर शिंदे, महेश गलांडे, संतोष आरडे, पश्चिम महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्वाती शिंदे, लहू बालवडकर, तुषार पाटील आदी उपस्थित होते. भाजी विक्रेत्यापासून ते मॉलपर्यंत, छोटा व्यावसायिक ते उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, डॉक्टरसह सर्व क्षेत्रांतील मान्यवर, युवा पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांना ही पुस्तिका देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतून राबविण्यात आलेल्या योजनांमुळे आपल्या देशाची प्रगती वेगाने होत आहेत. त्यांच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे काम मी करणार आहे. – संजय काकडे, माजी खासदार
हे ही वाचा :