शिक्रापूर: केंदूर (ता. शिरूर) येथे नवीन घराची नोंद करायची असेल तर आता संबंधित घर आणि परिसरात सीसीटीव्ही लावल्याशिवाय नोंद करायची नाही, असा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. दरम्यान, असा निर्णय घेणारे केंदूर हे पुणे जिल्ह्यातील पहिले गाव असून पुणे जिल्हा परिषदेनेही सदर सक्ती करण्याची विनंतीही यानिमित्ताने ग्रामस्थांना केली.
सरपंच प्रमोद प-हाड यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून घेण्यात आला असून पोलिस पाटील सतीश गावडे व माजी सरपंच सुर्यकांत थिटे यांच्या पुढाकाराने या निर्णयाचा एकमुखी ठराव केंदूर ग्रामस्थांनी केला.
ग्रामसुरक्षेच्या दृष्टीने गाव 24 तास सीसीटीव्ही कक्षेच्या नियंत्रणाखाली असावी म्हणून शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी हद्दीतील सर्व 43 गावांना गावातील प्रत्येक घराला सीसीटिव्ही लावण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
त्यानुसार केंदूर येथे संपूर्ण गाव सीसीटीव्हीयुक्त व्हावे म्हणून पोलिस पाटील सतीश गावडे यांनी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने माजी सरपंच सुर्यकांत थिटे यांनी केंदूरच्या ग्रामसभेपुढे सदर प्रस्ताव मांडला व यापुढे गावातील नवीन घरांच्या नोंदी सीसीटीव्हीशिवाय करू नयेत अशी मागणी केली. (Latest Pune News)
त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा देत गावात यापुढे नवीन घराच्या नोंदी सीसीटीव्ही लावल्याशिवाय करू नये असे एकमुखी ठरल्याची माहिती सरपंच प्रमोद पर्हाड व उपसरपंच मंगेश भालेकर, ग्रामविकास अधिकारी सुनील दरेकर यांनी दिली.
विद्युतदाहिनी करण्यासाठी जि. प.‘सीईओं’ना पत्र
गावातील जलस्त्रोत बळकट करण्यासाठी गावाने पाणीदार केंदूर प्रकल्प सुरू केला असून त्या निमित्त गावातील झाडेतोड बंद करून कु-हाड बंदी करण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी घेतला. या निर्णयामुळे आता अंत्यविधीवेळी दहन प्रक्रिया करण्यासाठी लाकडे उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची मोठी अड्चण होत आहे.

ती दूर व्हावी म्हणून गावातील बाभळी व निलगिरी तोडण्यासाठी परवानगी देण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली. यावर अशी मागणी नामंजूर करीत गावासाठी स्वतंत्र विद्युतदाहिनी लवकर उभी करू, यासाठी थेट पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांना ग्रामसभा ठराव पाठवून विशेष बाब म्हणून ती मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही सरपंच प्रमोद प-हाड यांनी दिली. व तसा ठराव घेण्यात आला.