पुणे : पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात गत तीन दिवसांत गत दहा वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. 22 मेपर्यंत एनडीए 111, पिंपरी चिंचवड 102, डुडुळगाव 68, पुरंदर 39 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून आगामी तीन दिवस पुन्हा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
यंदा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवून दिली असून उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने अनेक ठिकाणांचे रस्ते जलमय झाले आहेत. आगामी तीन दिवस पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
एनडीए 111, चिंचवड 102, मगरपट्टा 85, डुडुळगाव 68, तळेगाव ढमढेरे 39.5, पुरंदर 39.5, राजगुरुनगर 31.5, गिरीवन 27.5, हडपसर 24.5, तळेगाव 23, नारायणगाव 22.5, माळीण 20.5, बारामती 17, हवेली 15, कोरेगाव पार्क 15, बालेवाडी 13.5, लोणावळा 12.5, वडगावशेरी 11.5, पाषाण 11, भोर 11, शिवाजीनगर 8, दौंड 1.
गिरीवन 22, भोर 9.5, तळेगाव ढमढेरे 7, कोरेगाव पार्क 3.5, मगरपट्टा 3, तळेगाव 2.5, हवेली 1.5, पुरंदर 0.5, हडपसर 0.5, वडगावशेरी 0.5, नारायणगाव 0.5, शिवाजीनगर 0.3.