मंचर : मोरडेवाडी (ता. आंबेगाव) येथील मातोश्री कमलजादेवी नवरात्रोत्सवात जुनी एक रुपयाच्या नोटेचा 4711 रुपयांना लिलाव झाला. जुन्या नोटेचा लिलाव घेण्याचा मान बबूशेठ मोरडे यांना मिळाला. त्यामुळे त्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला.(Latest Pune News)
मोरडेवाडी येथील मातोश्री कमलजादेवी सेवा मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. उत्सवात मातोश्री कमलजादेवी पालखीची पावन मिरवणूक व महाआरती पार पडली. आरतीनंतर देवीची दानपेटी ग््राामस्थांसमोर उघडण्यात आली. त्यात एक रुपयाची जुनी दुर्मीळ नोट आढळली. जुनी नोट लिलावासाठी ठेवण्यात आली. त्यावेळी बोली वाढत अखेरीस ती नोट 4 हजार 711 रुपयांना मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बबूशेठ मोरडे यांनी विकत घेतली.
या बोलीमध्ये बबूशेठ मोरडे, समीर मोरडे, तुषार मोरडे, बाजीराव मोरडे, दिनकर मोरडे, मारुती मोरडे, संतोष ज्ञानेश्वर मोरडे, संदीप मोरडे, संतोष बा. मोरडे, नीलेश मोरडे, विशाल मोरडे, नवनाथ मोरडे, संतोष द. मोरडे, दत्ता ब. मोरडे, प्रशांत गोडसे यांनी सहभाग घेतला होता.
जुनी नोट विकत घेतल्यानंतर बबूशेठ मोरडे यांचा सन्मान करताना मान्यवर.