राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे Pudhari
पुणे

Someshwar Sugar Factory Chairman | 'सोमेश्वर’च्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे बिनविरोध

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Someshwar Cooperative Sugar Factory

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड गुरुवारी (दि. ५) बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे अनुभवी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांना संधी मिळाली तर उपाध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गातील सलग दोन वेळा संचालक पद भूषविलेले संग्राम सोरटे यांना संधी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी घेतलेल्या निर्णयातून अनुभवासोबत सामाजिक समीकरणांचाही समतोल साधण्यात आला आहे. कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले होते. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदासाठी राजवर्धन शिंदे या अनुभवी चेहऱ्याला अध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय झाला.

राजवर्धन शिंदे यांनी अध्यक्षपदाची हॅटिक साधली आहे. अनुभवी नेतृत्वासह तरुण चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची चर्चा होती. मात्र, कारखान्याचा अनुभव, प्रशासकीय कामकाजाची जाण आणि सहकार क्षेत्रातील योगदान यांना प्राधान्य देण्यात आले. उपाध्यक्षपद ओबीसी प्रवर्गाला देत सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न झाला. राज्यातील आघाडीच्या कारखान्यांमध्ये गणना होणाऱ्या सोमेश्वर कारखान्याच्या नव्या संचालक मंडळापुढे आता मोठी आव्हाने आहेत.

एकीकडे बारामती तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, तर दुसरीकडे आगामी गळीत हंगामाचे नियोजन, ऊस उत्पादकांना समाधानकारक दर, आर्थिक शिस्त आणि कारखान्याची प्रगती या बाबी महत्त्वाच्या ठरणार आहेत. निवडणुकीत २१-० असा ऐतिहासिक विजय मिळविलेल्या नव्या नेतृत्वाकडून सभासद आणि ऊस उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT