पुणे: राज्यातील बहुतांश भागांतून मोठा पाऊस शनिवारी थांबला; मात्र पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथा भागासह पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत 3 सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात 15 ऑगस्टपासून सुरू झालेला पाऊस 29 पर्यंत सुरूच होता. कोकण, विदर्भात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम, तर मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाने दाणादाण उडवून दिली. गेले पंधरा दिवस पाऊस सुरूच होता. (Latest Pune News)
शनिवारी 30 ऑगस्ट रोजी राज्याच्या बहुतांश भागांतून पाऊस थांबला. सकाळीच कडक ऊन पडल्याने गारवा कमी झाला. त्यामुळे नागरिकांना हायसे वाटले. मात्र, पुण्यासह कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यासह पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस 3 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.