पुणे : शहरात गणपतीच्या आगमनापासून ते गौरी विसर्जनापर्यंत (19 ते 24 सप्टेंबर) सहा दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अरबी समुद्रात पश्चिमी वार्यांनी जोर धरला असून, त्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासांत घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला,
मात्र शहरात 1 ते 1.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. 24 तासांत शिवाजीनगर 1.1, पाषाण 04, लोहगाव 0.2, लवळे 1.5, मगरपट्टा येथे 1 मि.मी.पाऊस झाला.
हेही वाचा