धनकवडी (पुणे) : सातारा रस्ता, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ परिसरात सकाळी आठपासूनच दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परिसरातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, पाऊस पडत नव्हता. अखेर पावसाला सुरिवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
परिसरात सकाळी आठच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. दुपारी पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि त्यानंतर चारच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. काठी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठून राहिल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थी, नोकरदार आणि पथारी व्यावसायिकांची या पावसामुळे तारांबळ उडाली.
हेही वाचा: