Rain alert till 14 July
पुणे: राज्यातील बहुतांश भागांत गुरुवारी ढगाळ वातावरण असूनही पावसाने विश्रांती घेतली. काही भागांत रिमझिम पाऊस झाला. मात्र, 11 ते 14 जुलै या कालावधीत राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Latest Pune News)
गेले दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस सुरू असून, विदर्भात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र भागात गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला. तसेच, मराठवाड्यातही मध्यम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जुलैच्या दुसर्या आठवड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. मात्र, 15 जुलैपासून राज्यातील पाऊस कमी होत असून, हलका पाऊस सुरू राहील. 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत आहेत.