पुणे

सलग दुसर्‍या दिवशीही पाऊस; 11 जूनपर्यंत राहणार अवकाळीचा जोर

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर आणि परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. विशेषत: वडगाव शेरी, एनडीए, खडकी, लोहगाव, चिंचवडसह आसपासच्या परिसरात पावसाचा जोर चांगलाच होता. दरम्यान, या पावसामुळे पुन्हा एकदा रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले तर काही भागात पाणी साठले. मान्सूनपूर्व पाऊस 11 जूनपर्यंत कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे शहर आणि परिसरात सोमवारपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील बहुतांश भागातील रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे अनेक वाहने पाण्यातच बंद पडली. मंगळवारीदेखील सकाळपासूनच शहर परिसरात उन्हाचा तडाखा चांगलाच जणवत होता. दुपारनंतर पुन्हा वडगाव शेरी, लोहगाव, पाषाण, एनडीए, कात्रज, लवळे, तळेगाव ढमढेरे, नारायणगाव आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही भागात झाडपडीच्या घटना घडल्या. 11 जूनपर्यंत शहरात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

शहर, परिसरात पडलेला पाऊस मि.मी.मध्ये

  • एनडीए 61.5
  • राजगुरुनगर 26.5
  • वडगावशेरी 20.5
  • शिवाजीनगर 9.1
  • लोणावळा 5.5
  • पाषाण 4.3
  • तळेगाव ढमढेरे 3.5
  • कोरेगाव पार्क 3
  • लवळे 2.0
  • नारायणगाव 1

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT