पुणे : अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.6) व बुधवारी (दि.7) हे दोन दिवस घराबाहेर पडताना सावधान रहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आगामी ४८ तास राज्यात सर्वंत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.
जम्मू कश्मीर ते तामिळनाडूपर्यंतच्या राज्यांत उद्यापासून पाऊस सुरु होत असून वादळीवारे अन् गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात येलो अलर्ट असाला तरी संपूर्ण उत्तर भारतात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रामुख्याने राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात धुळीच्या वादळासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी बहुतांश भागात (दि .6 व 7 मे) तर काही भागात ९ मे पर्यंत सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
- कोकण, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात आणि विदर्भात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे अन गारपीट होण्याची शक्यता.
पालघर (6,7), ठाणे (6,7), मुंबई (6,7), रागगड (6 ते 8), रत्नागिरी (7,8), सिंधुदुर्ग (8), धुळे (6,7,8), नंदुरबार (6 ते 8), जळगाव (6,7), नाशिक ( 6 ते 8), अहिल्यानगर (6,7), पुणे (6,7), कोल्हापूर (7), सातारा (7,8), सांगली (8), सोलापूर (8), छ.संभाजीनगर (6,7), जालना (6,7), नांदेड (6,7), लातूर (6,7), धाराशिव (6), भंडारा (6,7), चंद्रपूर (6,7,8,9), गडचिरोली (7,8,9), गोंदिया (6,7), नागपूर (6,7), वर्धा (6,7), यवतमाळ (6)
मालेगाव- 41.8, पुणे 38, जळगाव- 38.5, कोल्हापूर -37.7, महाबळेश्वर- 32.3, नाशिक- 36.9, सांगली-38.7, सातारा- 39, सोलापूर- 41.3, मुंबई- 34.2, अलिबाग- 33.7, डहाणू- 35.6, धाराशिव- 40.6, छ.संभाजीनगर -38.8, परभणी -41.4, बीड- 41.6, अकोला- 41.6, अमरावती- 37, बुलडाणा -38.5, ब्रम्हपुरी -40.2, चंद्रपूर- 40, गोंदिया- 37.1, नागपूर -38.4, वाशिम -39.8, वर्धा- 38.5,यवतमाळ- 40.2