Rain Alert |गणेश विसर्जन मिरवणुकीवर मुसळधारेची शक्यता कमी! Pudhari News
पुणे

Rain Alert |गणेश विसर्जन मिरवणुकीवर मुसळधारेची शक्यता कमी!

शनिवारी हवेचा दाब वाढणार असल्याने पावसाचे सावट मात्र राहणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यात 5 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस राहणार आहे.त्यामुळे शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,नाशिक,जळगाव जिल्ह्यांना पूरस्थितीचा तर कोकणला मुसळधारेचा अलर्ट देण्यात आला आहे. मात्र राज्यात शनिवारी हवेचे दाब वाढणार असल्याने मुसळधार पावसाचे सावट कमी होईल,त्यामुळे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहिल असा अंदाज हवामान तज्ञांनी दिला आहे.

राजस्थान,गुजरात,मध्यप्रदेश या राज्यात 5 ते 7 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज देण्यात आला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसणार आहे. कोकणात 5 रोजी अतिवृष्‍टी तर उर्वरित भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र शनिवारी 6 रोजी राज्यात हवेचे दाब कमी होणार असल्याने अतिमुसळधारेची शक्यता कमी होत आहे. त्यामुळे गणपतीच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान मध्यम पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा.

हवामान तज्ज्ञांच्या मते राज्यात शुक्रवार पर्यंत हवेचे दाब 1002 ते 1004 हेक्टा पास्कल इतके हवेचे दाब आहेत.त्यामुळे शुक्रवार 5 सप्टेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात अतिमुसळधार,विदर्भात मुसळधार तर मराठवाडा आणि मध्यमहाराष्ट्रात मध्यम स्वरुपाचा पाऊस राहिल. मात्र 6 रोजी हवेचे दाब 1004 ते 1006 इतके होत असल्याने राज्यात अतिवृष्टीची शक्यता कमी होत आहे.शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार,धुळे,नाशिक,जळगाव जिल्ह्यांना पूरस्थितीचा अलर्ट दिल्ली वेधशाळेने दिला आहे.तसेचे गुजरात,राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांनाही शुक्रवारी पूरस्थितीचा अलर्ट देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT