पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार, दि. 26 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अंतिम फेरीतील महाविजेता संघ रविवारी (दि. 28) ठरणार आहे. ही स्पर्धा भरत नाट्य मंदिर येथे आयोजित केली आहे.
पुण्यासह रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर केंद्रांवर झालेल्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकांच्या महाअंतिम फेरीला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे.
दोन दिवस सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात तर दि. 28 डिसेंबरला सकाळच्या सत्रात स्पर्धा होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ दि. 28 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला आहे. महाअंतिम फेरीच्या स्पर्धेचे लॉट्स गुरुवारी काढण्यात आले.