पुणे

 Pune’s killer Porsche : मुलगा दारू पितो हे वडिलांना माहीत होते; वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने तो दारू पीत असल्याचे मान्य केले आहे.  धक्‍कादायक बाब म्‍हणजे मुलगा दारु पित असल्‍याचे त्‍याच्‍या वडिलांना माहित हाेते. तरीही त्‍यांनी त्‍याला अलिशान पोर्शे कार चालविण्‍यास दिली असल्‍याचे पाेलीस तपासात स्‍पष्‍ट झाले  आहे. ( Pune's killer Porsche )

काय आहे प्रकरण?

  • पुण्यात रविवारी (दि.१९) पहाटे भऱधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली, यात तरुण-तरुणी ठार
  • संशयीत आरोपी अल्पवयीन; 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांचा मुलगा
  • मुलाकडे वाहन परवाना नसताना वडिलांनी पोर्शे कार चालवायला दिली होती

वडिलांना माहित होत, तो दारु पितो

मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्श कारने चालवत रविवारी (दि.१९) पुण्यातील दाेन आयटी इंजिनिअरला चिरडले. अल्पवयीन आरोपीने पाेलिसांना सांगितले आहे की, मी दारु पीत असल्‍याचे वडिलांना माहित होते. त्यांनीच मला कार दिली. या प्रकरणी दाखल गुन्‍ह्यात नमूद करण्‍यात आलं आहे की, "आरोपीकडे वैध वाहन परवाना आणि कार चालवण्याचे वैध प्रशिक्षण नाही, हे माहित असुनही त्याच्या वडिलांना त्याला कार चालवायला दिली होती. त्याचबरोबर त्याला पार्टी करायला परवानगीही दिली होती. " Pune's killer Porsche

वडिलांसह पाच जणांवर गुन्हा

पोर्शे कार अपघातातील आरोपीचे वडील, 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांच्यासह हॉटेल मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेलचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर अशा चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशाल अग्रवाल यांना आज (दि.२१) सकाळी संभाजीनगर येथून अटक करण्‍यात अआली आहे.

कुटुंबीयांचा आक्रोश

पुणे अपघातातील अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया यांच्या कुटुंबीयांनी मुलांचे मृतदेह पाहताच आक्रोश केला. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकमेव मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते. या अपघाताने दोघांते नातेवाईक हादरले आहेत.  Pune's killer Porsche

ही हत्या आहे, अपघात नाही

अनिशचे आजोबा आत्माराम अवधिया म्हणाले की, पुण्यातील प्रख्यात बिल्डरचा मुलगा किशोर ड्रायव्हरला जामीन मिळायला नको होता. "या अपघातात दोन जणांचा जीव गेला, हे पूर्णपणे चुकीचे आहे. या अपघातातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, असे आमचे मत आहे. त्यामुळे आरोपींना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा," अशी इच्छा मृत अनिश याच्या आजोबांनी व्यक्त केली आहे. अनिसचे  काका अखिलेश अवधिया म्हणाले, "अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि ताशी २४० किमी वेगाने गाडी चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे 'ही हत्या आहे, अपघात नाही."

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT