पुणे

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर

अमृता चौगुले

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा शिक्षक पुरस्कार, केंद्रप्रमुख पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्काराची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील एकूण 37 शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली. जिल्हास्तरावरून नियुक्त केलेल्या अधिकार्‍यांमार्फत निवड समितीने गुणांकन विचारात घेऊन शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली.

प्रत्येक तालुक्यातील एक शिक्षक, एक उत्तेजनार्थ, प्रथम, द्वितीय, तृतीय, असे 3 केंद्रप्रमुख असे एकूण 13 तालुक्यांतील 29 पुरस्कार जाहीर करण्यात आले. तसेच, अध्यक्ष चषक पुरस्कारासाठी एकूण 36 जिल्हा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2021-22 व सन 2022-23 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून 5 किंवा 5 पेक्षा जास्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असलेल्या शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना जिल्हास्तरावरून पुरस्कार देण्यासाठी 102 शिक्षकांची नावे प्राप्त झालेली आहेत. राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केलेल्या पुणे जिल्ह्यातील 124 विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT