Zilla Parishad Election Pudhari
पुणे

Pune Zilla Parishad Election Battle: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अ.प.) व भाजप आमनेसामने

73 पैकी 59 गटांत थेट लढत; अजित पवारांच्या निधनामुळे प्रचाराच्या रंगत बदलली

पुढारी वृत्तसेवा

गजानन शुक्ला

पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग््रेास (अ.प.) आणि भाजपमध्येच लढत रंगणार आहे. जिल्ह्यातील 73 गटांपैकी तब्बल 59 गटांत राष्ट्रवादी काँग््रेास (अ.प.) आणि भाजप समोरासमोर उभे ठाकले आहेत. आंबेगाव, मावळ आणि मुळशी तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत अखंड राष्ट्रवादी काँग््रेास सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. मात्र, यंदा भाजपने आक्रमक रणनीती आखल्याने चित्र बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राष्ट्रवादी कॉंग््रेासचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निवडणूक प्रचारकाळातच विमान दुर्घटनेत आकस्मिक निधन झाल्याने या निवडणुकीचा पार नूरच पालटून गेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेबुवारी रोजी मतदान होणार असून, एकूण 299 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील सत्तासमीकरणे यंदा प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादीच्या कामगिरीवर अवलंबून राहणार आहेत. दोन्ही पक्षांनी जवळपास सर्वच गटांत ताकद लावल्याने लढत चुरशीची होणार आहे. शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग््रेास तसेच मोठ्या संख्येने उभे राहिलेले अपक्ष उमेदवारही अनेक गटांत निकालांवर निर्णायक प्रभाव टाकू शकतात.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार) हे दोन्ही गट एकत्रितपणे लढत असल्याचे चित्र आहे. काँग््रेासने वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केली असून, या आघाडीची कामगिरीही लक्षवेधी ठरणार आहे. पक्षनिहाय उमेदवारांचा विचार करता राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष 71 गटांत निवडणूक लढवत असून सर्वाधिक जागांवर उमेदवार देणारा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाट भाजपने 59 गटांत उमेदवार उभे केले आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 7 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना (शिंदे गटाने) 36, तर शिवसेना (उबाठा) पक्षाने 26 ठिकाणी उमेदवार दिले आहेत.

याशिवाय काँग््रेास, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आणि बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांचे उमेदवारही विविध गटांत आपले नशीब आजमावत आहेत. मोठ्या संख्येने असलेले अपक्ष उमेदवार अनेक ठिकाणी लढतीचे गणित बिघडवू शकतात. विशेषतः हवेली, दौंड, शिरूर आणि इंदापूर या तालुक्यांत भाजपड्ढराष्ट्रवादी संघर्ष तीव होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आंबेगाव, मावळ आणि मुळशी येथे दोन्ही राष्ट्रवादी गट समोरासमोर आल्याने या तालुक्यांतील निकालांकडे कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष राहणार आहे. खेड, जुन्नर, भोर मध्ये दोन्ही शिवसेनेचे एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.

सन 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर मागील 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेासने 44 जागा जिंकून जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली होती. शिवसेना 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती, तर भाजप आणि काँग््रेासला प्रत्येकी 7 जागांवर विजय मिळाला होता. या वेळी चित्र कसे राहील आणि कोणता पक्ष आघाडी घेईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अजित पवारांच्या निधनामुळे प्रचारावर परिणाम

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार जोमात अतानाच बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग््रेाससह सर्वच पक्षांनी जाहीर प्रचार, सभा आणि रॅली टाळल्या. या काळात केवळ वैयक्तिक गाठीभेटी आणि पत्रके वाटून मर्यादित स्वरूपात प्रचार करण्यात आला. अजितदादांच्या निधनाने त्यांच्या पक्षाचे उमेदवार, नेते यांना तर मोठा धक्का बसला त्यांची बहुसंख्य मदार अजितदादांच्या सभांवर अवलंबून होती. या धक्क्यातून सावरत त्यांनी प्रचार सुरू केला आहे. बऱ्याच कालखंडानंतर अजित पवार यांच्या होणाऱ्या दणकेबाज सभा या निवडणूक प्रचारात होत नसल्याने प्रचार सुनासुना झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT