पुणे : रॅली महिला सक्षमीकरणाची, आत्मविश्वासाची, सन्मानाची अन् आत्मनिर्भरतेची... असा महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद करणाऱ्या आणि महिला शक्तीला सलाम करणाऱ्या क्रस्ना डायग्नोस्टिक प्रायोजित दै. ‘पुढारी’ आणि ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या वतीने महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले आहे.
ही बाईक रॅली शनिवारी (दि. 28 मार्च) आयोजित करण्यात आली आहे आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शनिवारी सकाळी सात वाजता चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरपासून रॅली निघणार आहे.
‘दै. पुढारी कस्तुरी क्लब’च्या वतीने नेहमीच महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. महिलांना एक व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठीही कस्तुरी क्लब कार्यरत आहे. महिला भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले जाते. या रॅलीत दरवर्षी मोठ्या संख्येने महिला सहभागी होतात आणि बाईक चालवून महिला सक्षमीकरणाचा संदेश देतात. यंदाही मोठ्या उत्साहात रॅलीचे आयोजन केले असून, शनिवारी (दि. 28) होणाऱ्या या रॅलीत शेकडो महिला सहभागी होणार आहेत.
‘रॅली महिलांच्या आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची’ अशी रॅलीची संकल्पना आहे. ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
क्रस्ना डायग्नोस्टिक हे रॅलीचे मुख्य प्रायोजक आहेत, तर डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद कॉलेज, सुवर्णकला जेम्स ॲण्ड ज्वेलरी, टायगर ब्रॅण्ड मसाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रॅलीत कस्तुरी सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. या बाईक रॅलीसाठी ड्रेस कोड असून, कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स किंवा लेगिन्स घालावी. या रॅलीमध्ये महिलांना प्रवेश विनामूल्य आहे. बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकीला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
दै. ‘पुढारी’च्या वतीने आयोजित केलेल्या महिला भव्य बाईक रॅलीत कस्तुरी क्लब सदस्यांसह इतर महिलांनाही सहभागी होता येणार आहे. त्यासाठी पूर्वनावनोंदणी करणे आवश्यक आहे. बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिला भव्य बाईक रॅलीच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी 8888808027/ 7040848572
या क्रमांकांवर संपर्क साधावा.
रॅली कधी : शनिवार,
दि. 28 मार्च 2026
वेळ : सकाळी 7 वाजता
स्थळ : श्री मोरया गोसावी
मंदिर, चिंचवडगाव
ड्रेस कोड : कोणत्याही रंगाची नऊवारी किंवा पांढरा कुर्ता आणि निळी जीन्स किंवा लेगिन्स.
प्रत्येक सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू
नारीशक्ती बाईक रॅलीमध्ये डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने महिलांची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच नेत्रतपासणी, कान-नाक-घसा (एछढ) तपासणी, आयुर्वेद सल्ला आणि पंचकर्म उपचारांचा समावेश आहे. यामध्ये सहभागी महिलांना ऊझण आयुर्वेद आरोग्य कार्ड मोफत देण्यात येणार आहे.
नारी शक्ती बाईक रॅलीमध्ये क्रस्ना डायग्नोस्टिकच्या वतीने महिलांची मोफत रँडम रक्त तपासणी करण्यात येणार आहे; तसेच विविध तपासण्यांसाठी 20 टक्के सवलत असलेले डिस्काउंट व्हाऊचर सर्व महिलांना मोफत देण्यात येणार आहे
रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. रॅलीचे गिफ्ट पार्टनर असलेल्या सुवर्णकला जेम्स ॲण्ड ज्वेलरी, टायगर ब्रॅण्ड मसाले यांच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत.