Oil And Pulses Pudhari
पुणे

Pune Wholesale Market Prices: पुणे भुसार बाजारात दरांचा चढ-उतार; डाळ-तेल महाग

मसूर, शेंगदाणे आणि साखरेचे दर वाढले; तर नारळ आणि बाजरीच्या किमतीत घट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मार्केट यार्डातील भुसार बाजारात सध्या काही जीवनावश्यक वस्तूंच्या दरात चढ-उतार दिसून येत आहेत. परदेशातून होणारी मसूर डाळीची आवक घटल्याने घाऊक बाजारात तिच्या दरात किलोमागे सुमारे पाच रुपयांची वाढ झाली आहे. तसेच, शेंगदाण्यालाही मागणी वाढल्याने त्याच्या दरात किलोमागे तीन ते चार रुपयांची तेजी नोंदविण्यात आली आहे.

यंदा उसाचा तुटवडा असल्याने गुऱ्हाळे मोठ्या प्रमाणात बंद आहेत. परिणामी, गुळाच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. साबूदाण्याच्या दरातही किलोमागे दोन रुपयांची वाढ झाली असून, साखर आणि खाद्यतेलाच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे. साखरेचे दर क्विंटलमागे 25 ते 35 रुपयांनी वाढले असून, खाद्यतेल 15 किलोच्या डब्यामागे 20 ते 25 रुपयांनी महागले आहे. धान्य बाजारात बासमती तांदळाच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे मागणी कमी झाल्याने बाजरीच्या दरात क्विंटलमागे दोनशे रुपयांची घट झाली आहे. नव्या गव्हाच्या हंगामामुळे रवा, मैदा आणि आट्याच्या दरातही किंचित घसरण झाली आहे. दरम्यान, यंदा नारळाचे उत्पादन चांगले झाल्याने बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे नारळाच्या दरात क्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांची घट झाली आहे.

येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे:-

साखर (प्रतिक्विंटल) 4025-4075 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2670-2850, रिफाईंड तेल 2300-3000, सरकी तेल 2150-2550, सोयाबीन तेल 2250-2550, पामतेल 2300-2450, सूर्यफूल रिफाईंड तेल 2400-2600, खोबरेल तेल 4300, वनस्पती 1850-2300 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3100-3500, सोना मसूरी 4000-4800, एच.एम.टी. कोलम 5200-5500, लचकारी कोलम 6000-6500, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500, इंद्रायणी 7000 रु.

गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-3800, नं.3 3075-3650, सिहोर नं. 1 5700-6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 2850-2900 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6500, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 3800-4000, महिको नं.2 3400-3600, गावरान 3300-3500, हायब्रीड 3050-3300 रु. गूळ :- गूळ नं. 1 4600-4750, गूळ नं.2 4300-4450 गूळ नं.3 4100-4250, बॉक्स 4300-5500 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12600, हरभराडाळ 7000, मूगडाळ 9800-10000, मसूरडाळ 7550-7650, मटकीडाळ 8200-8300, उडीदडाळ 10000-12000 रु.

कडधान्ये:-हरभरा 6000-6500, मसूर 7200-8200, मूग 9000-9500, मटकी गावरान 9500-12500, मटकी पॉलिश 6800-7000, मटकी गुजरात 7200-8200, मटकी राजस्थान 9500-12500, मटकी सेलम 15000-17200, वाटाणा हिरवा 6000-6200, वाटाणा पांढरा 4900-5200, काबुली चणा 7400-11200 रु. साबुदाणा :-साबुदाणा नं.1 6200, साबुदाणा नं.2 5800, साबुदाणा नं.3 5600 रु. वरई भगर :-13000-13500, सावा भगर 12500-13000 रु. गोटा खोबरे 3300-3600 रु. शेंगदाणा :- जाडा 11000-12500, स्पॅनिश12800-14000, घुंगरु 11800-12800 टीजे 11200-11600 रु. रवा, मैदा, आटा- (50 किलोचा भाव) आटा 1600-1650, रवा 1650-1750, मैदा 1650-1750, नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1700-1850, मद्रास 4600-4800, पालकोल जुना 2100-2300, सापसोल 3500-5000 रु.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT