Water Supply Pudhari
पुणे

Pune Water Supply Shutdown: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद

जलकेंद्रे, पंपिंग स्टेशन व पाण्याच्या टाक्यांची देखभाल-दुरुस्ती; शुक्रवारी सकाळचा पुरवठाही कमी दाबाने होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील जलकेंद्रे, पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये तातडीची विद्युत, पंपिंग तसेच स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. २७) पुण्याच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवार (दि. २६) मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवार (दि. २७) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा शटडाऊन राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे शुक्रवारी (दि. २८) सकाळचा पाणीपुरवठा उशिराने आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत स्टेज एक आणि पर्वती एचएलआर झोन, भामा-आसखेड परिसर, वारजे जलकेंद्र तसेच त्याअंतर्गत एसएनडीटी एचएलआर, चांदणी चौक, गांधी भवन, पॅनकार्ड क्लब, वारजे जलकेंद्रालगतची जीएसआर टाकी, पाषाण-सूस गोल टाकी आणि चतुःशृंगी टाकी परिसराला या शटडाऊनचा फटका बसणार आहे. सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षिनगर, गंगाधाम, अप्पर आणि लोअर इंदिरानगर, कोंढवा खुर्द, लोहगाव, कळस-धानोरी, टिंगरेनगर, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, येरवडा आणि खराडी या भागांतील पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.

औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, गोखलेनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी आणि सूस रस्त्यालगतच्या भागातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होणार आहे. बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, कर्वेनगर, वारजे, रामनगर, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे-धावडे, मुळा रस्ता आणि खडकी कॅन्टोन्मेंट परिसराचाही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

राजीव गांधी पंपिंग केंद्रांतर्गत आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, संतोषनगर, दत्तनगर, मोरेबाग, बालाजीनगर, सुखसागरनगर आणि येवलेवाडी परिसरालाही पाणीपुरवठा बंदचा फटका बसणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT