Pune fire news file photo
पुणे

Pune news: पुण्यात टीव्हीएस शोरूमला भीषण आग; ६० दुचाकी जळून खाक

बंडगार्डन रस्त्यावर ताराबाग या तीन मजली इमारतीत सोमवारी रात्री तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीचे शोरूम व सर्व्हिस सेंटर येथील असणाऱ्या दुचाकींना आग लागल्याची घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Pune fire news

पुणे : बंडगार्डन रस्त्यावर ताराबाग या तीन मजली इमारतीत सोमवारी रात्री तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीचे शोरूम व सर्व्हिस सेंटर येथील असणाऱ्या दुचाकींना आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून नायडू व येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन व मुख्यालयातील एक वॉटर टँकर तातडीने रवाना करण्यात आला होता. (Pune News)

घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले की, तीन मजली इमारतीत तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून दुचाकी वाहने पेटल्याने प्रचंड धूर निर्माण झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथम आतमध्ये कोणी अडकल्याची खात्री करताना एकजण धुरामुळे अडकल्याचे समजताच जवानांनी त्याला एकीकडे सुखरूप बाहेर काढून इतरत्र पाण्याचा मारा सुरु केला. धूर जास्त प्रमाणात असल्याने श्वसन यंत्र परिधान करीत सुमारे तीस मिनिटांत आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले.

या घटनेत इलेक्ट्रिक व पेट्रोल अशा एकूण ६० दुचाकी जळाल्या असून यामध्ये काही नवीन तसेच दुरुस्ती करिता आलेल्या दुचाकी असल्याचे समजले. या ठिकाणी इलेक्ट्रिक वायरिंग, यंत्र सामुग्री, बॅटरी, वाहनांचे सुटे भाग, संगणक, सोफा, एसी, टेबल-खुर्च्या, कागदपत्रे देखील आगीत जळाली आहेत. आगीचे नेमके कारण समजले नसून अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आपले कार्य वेळेत पार पाडत पुढील धोका टाळला. यावेळी महावितरण कर्मचारी वर्ग व पोलिस उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT