Crime News Pune Pudhari
पुणे

Crime News Pune: खासगी क्लासच्या ऑफिस बॉयचा विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; व्हिडीओ चित्रीकरणही केले

आरोपीवर पोक्सोचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: खासगी शिकवणीच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका ऑफिस बॉयने बारा वर्षांच्या विद्यार्थी मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी ऑफिस बॉयला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास दिलीप गायकवाड (वय 35, मूळ रा. हराळवाडी, सोलापूर) असे आरोपी ऑफिस बॉयचे नाव आहे. याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा इयत्ता 8 वीमध्ये शिकत असून, तो एका खासगी शिकवणीला जातो.

गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण झाल्यानंतर तो वडिलांना म्हणाला, ‌‘उद्या शाळेत जाणार नाही.‌’ वडील त्याला म्हणाले, ‌‘तू अनेकदा सुट्टी मारतो. तुला शाळेत जायला हवे.‌’ त्या वेळी मुलगा रडायला लागला. वडिलांनी विश्वासात घेऊन त्याला विचारले असता त्याने विकासच्या कृत्याची माहिती दिली. विकास हा डिसेंबर 2025 पासून मुलावर लैंगिक अत्याचार करीत होता.

एवढेच नव्हे, तर आरोपीने मुलाचे फोटो काढून त्याला मानसिक त्रास दिला. त्यानंतर वडिलांनी क्लासमध्ये जाऊन माहिती घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी गायकवाडला अटक केली असून, पुढील तपास मार्केट यार्ड पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT