पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री शनिवारी पुणे दौर्यावर येत असून, या वेळी ते शासकीय कार्यालयांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. शहरात विविध शासकीय कार्यालयांचे काम सुरू आहे. पुणे शहर आणि परिसरात शासकीय इमारती उभारण्याचे काम सुरू आहे. सारथी कार्यालयाचे काम सेनापती बापट रोडवर सुरू आहे. याकरिता 87 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याचबरोबर प्रादेशिक कार्यालय व वसतिगृह, औंध या ठिकाणी बांधण्यात येत आहे.
याकरिता 175 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालय, साखर संकुलजवळ उभारण्यात येत आहे. याकरिता 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच कामगार आयुक्तालय उभारण्यात येत आहे. शिक्षण आयुक्तालय सेनापती बापट रोडवर उभारण्यात येत आहे. याकरिता तब्बल 87 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. कॉन्सिल हॉलजवळ नोंदणी भवन बांधण्यात येत आहे. याकरिता 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सहकार आयुक्तालयाचे 108 कोटी रुपयांचे काम सुरू असून, सेंट्रल बिल्डिंग 02 येरवडा येथे उभारण्यात येणार आहे.
हेही वाचा