हॉटेलांध्ये मेलेल्या कोंबड्यांची विक्री  
पुणे

पुणे : स्‍वर्णवचा अपहरणकर्ता अद्याप फरारच; श्वान पथकाचीही मदत, विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

निलेश पोतदार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बुधवारी दुपारी स्वर्णव हा आपल्या घरी परतल्यानंतर देखील अपहरणकर्त्याचा गेल्या २४ तासात शोध लागू शकला नाही. दरम्यान, पुणे पोलिसांनी चिखली, पिंपरी चिंचवड परिसरात आज (शुक्रवार) विविध ठिकाणी छापे घालून आरोपींचा शोध घेतला. बाणेर येथील स्वर्णव सतीश चव्हाण (वय ४) या मुलाला अपहरणकर्त्याने तब्बल ८ दिवसांनंतर सोडून दिले. 11 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून त्याचे अपहरण करण्यात आले होते. गुरूवारी दिवसभर अतिवरिष्ठ अधिकारी अपरहरणकर्त्याच्या शोधासाठी परिसरात तळ ठोकून होते.

डुग्गु सापडल्यानंतरही पोलिसांनी अगोदर ज्या प्रकारे तपास केला जात होता, त्याच पद्धतीने अजून तपास सुरु असून आम्ही लवकरच अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचू, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

स्वर्णव याचे अपहरण कशासाठी केले यामागील कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. अपहरणकर्त्यांने त्याला सोडण्यासाठी खंडणी मागितली नसल्याने पोलिसांकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर या अपहरणकर्त्यांने आपण सीसीटीव्हीमध्ये दिसणार नाही, याची काळजी घेतलेली दिसून येते. डुग्गु याला ज्या ठिकाणी सोडले, त्या ठिकाणच्या आजू बाजूच्या परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी येथील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे लक्षात आले. या परिसरात पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करुन काही पुरावे मिळविण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावरील बंद असलेले कॅमेरे हे अपहरणकर्त्याच्या पथ्यावरच पडले. नऊ दिवस दिवसरात्र चारशेपेक्षा अधिक पोलिसांनी तपास केला. यावेळी तब्बल पाचशेपेक्षा अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. २० ते २५ ठिकाणी अपहरणकर्ता कॅमेऱ्यात कैद देखील झाला. मात्र, ते अतिशय अस्पष्ट असल्याने त्यावरुन ओळख पटविणे अवघड झाले आहे.

अपहरणकर्त्याने डुग्गुला पळवून नेता काळे जॉकेट, डोक्याला हेल्मेट व पाठीला सॅक अडकवली होती. डुग्गुला बुधवारी सोडवतानाही त्याने काळे जॉकेट घातले होते. संपूर्ण चेहरा झाकला होता. सोडताना तो डुग्गुला चालत घेऊन आला होता. जातानाही चालत गेला होता. त्याची चालण्याची वेगळीच लकब असल्याचे दिसते. दुचाकीवरून त्याने डुग्गुचे अपरहण केले. दुचाकीला समोर क्रमांक नाही. तर पाठीमागच्या नंबरप्लेट स्पष्ट दिसत नाही. त्याच्यावर आरोपीने चिखल लावल्याची शक्यता आहे.

डुग्गू सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व परिसरातील नाकाबंदी केली. गुरूवारी दिवसभर पोलिसांची पथके पुनावळे परिसरात तळ ठोकून होती. गेल्या ८ दिवसात बरोबर असून डुग्गु हा व्यवस्थित दिसत होता. त्याला पाहण्यासाठी येताना वाटेत अपघात होऊन त्यात आत्याचा मृत्यु झाल्याने पोलिसांच्या तपासाला अडथळा आला. अपहरणकर्त्यानेही तो त्याच्या पालकांपर्यंत पोहचावा पण आपल्याला ओळखू नये, अशा व्यक्तीची निवड केलेली दिसते. तो सोडून गेल्यानंतरच डुग्गु रडू लागला, यावरुन तो परिचित असावा, असे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT