एसटी घडवणार देवदर्शन अन् पर्यटन file photo
पुणे

Pune ST: एसटी घडवणार देवदर्शन अन् पर्यटन

‘पाच ज्योतिर्लिंग’, ‘अक्कलकोट-गाणगापूर’, ‘अष्टविनायक’साठी स्वारगेट आगारातून बससेवा; रायगडची करता येणार सहल

पुढारी वृत्तसेवा

पुणे: जर तुम्ही पर्यटनाचे शौकीन असाल किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याची तुमची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत असलेल्या स्वारगेट आगाराने पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन विशेष बस सेवांचे नियोजन केले आहे. या बस सेवांमुळे पर्यटकांना महाराष्ट्रातील ‘पाच ज्योतिर्लिंग’, ‘अक्कलकोट-गाणगापूर’, ‘रायगड दर्शन’ आणि ‘अष्टविनायक’ या चार महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देणे सोपे होणार आहे.  (Latest Pune News)

अशी विशेष पर्यटन बससेवा

पाच ज्योतिर्लिंग दर्शन : (भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ) : दिनांक : 19 ते 17 जुलै 2025 (3 दिवसांची सहल) : बस प्रकार - निमआराम

गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर : दिनांक : 22 ते 23 जुलै 2025 (2 दिवसांची सहल) :बस प्रकार - निमआराम

अष्टविनायक दर्शन : दिनांक : 25 ते 26 जुलै 2025 (2 दिवसांची सहल) :बस प्रकार - निमआराम

रायगड दर्शन : दिनांक 30 जुलै 2025 (1 दिवसाची सहल) : बस प्रकार - निमआराम

या पर्यटन सेवांमुळे प्रवाशांना एसटी बसच्या माध्यमातून सुरक्षित प्रवास करत महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या स्थळांना भेट देता येणार आहे. त्यामुळे पुणेकरांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
- पल्लवी पाटील, आगार व्यवस्थापक, स्वारगेट एसटी आगार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT