Pune Tree Collapse: कडकड आवाज अन् क्षणात कोसळली भलीमोठी फांदी; दैव बलवत्तर म्हणूनच वाचले तीन जण

दै. ‘पुढारी’ कार्यालयाजवळील घटना
Pune Tree Collapse
कडकड आवाज अन् क्षणात कोसळली भलीमोठी फांदी; दैव बलवत्तर म्हणूनच वाचले तीन जणPudhari
Published on
Updated on

पुणे: नेहमीप्रमाणे वर्दळीचा असलेला मित्रमंडळ चौक परिसर... सायंकाळचे पाच वाजलेले... वाहने आणि पादचार्‍यांची तुरळक वर्दळ सुरू होती... रविवार असल्याने सर्वत्र शांतता... मात्र, अचानक ‘कडकड’ असा जोराचा आवाज झाला अन् काही कळायच्या आतच डोक्यावरून भलीमोठी फांदी खाली येत असल्याचे लक्षात येताच पादचार्‍यांची एकच धावपळ उडाली.

दै. ‘पुढारी’ कार्यालयाशेजारी असलेल्या एका मोठ्या जांभळाच्या झाडाची भलीमोठी फांदी कोसळली. थोडक्यात बचावल्याने तिथून जाणार्‍या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि देवाचे आभार मानले. (Latest Pune News)

Pune Tree Collapse
Pune Real Estate: घर घेणार तर पुण्यातच! अनिवासी भारतीयांचीही ‘सेंकड हाेम’साठी पहिली पसंती

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मे महिन्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे नीलायम टॉकीजसमोर धावत्या रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षात बसलेल्या शुभदा सप्रे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याच्या अगोदर फक्त दोनच दिवसांपूर्वी अलंकार पोलिस ठाण्याजवळ असेच झाड कोसळून राहुल जोशी यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर रविवारी

(दि. 13) वारा वा पाऊस नसतानाही जांभळाच्या झाडाची भलीमोठी फांदी कोसळली. त्यामुळे शहरातील जुनी आणि धोकादायक झाडे पुन्हा एकदा पुणेकरांसाठी चिंतेचा विषय बनली आहेत.ही घटना पर्वती परिसरातील मित्रमंडळ चौकाजवळ ‘पुढारी’ कार्यालयाशेजारी रविवारी (दि. 13) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

झाड कोसळल्यामुळे परिसरातील केबल तुटल्या आणि काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. झाडाखालीच थांबलेले तीन पादचारी सुदैवाने तत्काळ तिथून बाजूला झाल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच जनता अग्निशमन केंद्राचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रभारी अधिकारी प्रवीण रणदिवे, चालक संतोष

हातमोडे, फायरमन अरुण धनवडे, अक्षय बाबर, विक्रम गायकवाड, जयेश गांगोडा आणि अथर्व काटे यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यांनी इलेक्ट्रिक चेन सॉ, कुर्‍हाड आणि दोरीच्या मदतीने झाडाच्या मोठ्या फांद्या कापून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यानंतर उद्यान विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी उर्वरित फांद्या कापून एका

Pune Tree Collapse
Pune News: इमारती, पूल कोसळताहेत; त्याला जबाबदार कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

बाजूला ढीग करून ठेवला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पर्वती (प्रभाग 29)चे अध्यक्ष समीर सय्यद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी येऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेत वाहनांना रस्ता मोकळा करून दिला.

जीर्ण झालेली झाडे यमदूत ठरण्याचा धोका

या घटनेमुळे पुणे शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या झाडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

अग्निशमन दलाचे नीलेश महाजन यांनी सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळताच आम्ही याबाबतची माहिती जनता अग्निशमन केंद्राला दिली. तेथील आमचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी पडलेल्या झाडाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

...अन् अर्ध्या फुटावर येऊन पडली भलीमोठी फांदी !

झाड पडण्याच्या सुमारास ना वारा ना पाऊस होता; वातावरण अगदी निरभ्र होते. नेहमीप्रमाणे पदपथावरून पादचार्‍यांची ये-जा सुरू होती. माझ्यासह आणखी दोघे झाडाखालीच थांबले होतो. अचानक कडकड असा वरून आवाज आला. पाहतो तर काय! झाडाची फांदी कोसळत असल्याचे दिसले. आम्ही तत्काळ बाजूला झालो अन् अगदी अर्ध्या फुटावर जांभळाच्या झाडाची एक भलीमोठी फांदी येऊन पडली.दैव बलवत्तर म्हणून आमचे प्राण वाचले, असे तेथील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news