पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी दै. 'पुढारी'चे वरिष्ठ बातमीदार पांडुरंग सांडभोर विजयी झाले. सरचिटणीसपदी 'तरुण भारत'चे सुकृत मोकाशी आणि चिटणीसपदी दै. 'पुढारी'च्या प्रज्ञा केळकर-सिंग यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी दै. 'पुढारी'चे शंकर कवडे आणि भाग्यश्री जाधव निवडून आले आहेत.
पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी उमेश शेळके (सकाळ) आणि स्वप्निल शिंदे (महाराष्ट्र टाईम्स), खजिनदारपदी अंजली खमितकर (प्रभात), चिटणीसपदी पूनम काटे (राष्ट्र संचार) यांची निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य पुढीलप्रमाणे : हर्ष दुधे, वरद पाठक, श्रद्धा सिदीड (महाराष्ट्र टाईम्स), विक्रांत बेंगाळे (आज का आनंद), शहाजी जाधव (सकाळ), विनय पुराणिक (पुण्यनगरी), गणेश राख (सामना), संभाजी सोनकांबळे (लोकमत).
हेही वाचा :