Vandana Prakash Pawar Pudhari
पुणे

Shirur News: जातेगावचे पवार कुटुंब म्हणजे माझ्या घरातील माणसं; अजित पवारांच्या आठवणींने वंदना पवार भावूक

Shirur NCP | जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे पवार यांचा प्रचार दौऱा

पुढारी वृत्तसेवा

Shirur NCP Vandana Pawar

शिक्रापूर: जातेगावचे पवार कुटुंब म्हणजे माझ्या घरातील माणसं असे अजितदादा आवर्जून सांगायचे. या मुळे आम्ही कधी दादांच्या आदेशाच्या बाहेर गेलो नाही. दादा देतील तो राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचे प्रामाणिक काम पाबळ केंदूर जिल्हा परिषद गटात केले, असे पाबळ पंचायत समिती गणाच्या उमेदवार वंदना पवार यांनी सांगितले.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे पती व बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्ष केशर ताई पवार उपस्थित होते.

यावेळी प्रकाश पवार म्हणाले की, दादा नेहमी शासकीय अधिकाऱ्यांना तसेच राजकीय लोकांना आवर्जून सांगायचे की, ही माझी भावकी आहे. हे माझ्या घरातील कुटुंब सदस्य आहेत. यांची समाज हिताची सर्व कामे तातडीने पूर्ण केली पाहिजे. असे आदेश ते अधिकाऱ्यांना नेहमी देत. यामुळे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आणण्यासाठी दादांमुळे व अधिकाऱ्यांमुळे शक्य झाले.

केशरताई पवार यांना कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी संधी ही दादांमुळे मिळाली. यामुळे दूध खरेदीमध्ये शेतकऱ्यांना दर वाढवून देण्यासाठी काम करता आले. दादांशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधाचा मला समाज हितासाठी काम करताना फायदा झाला. चासकमान कालव्याला पाणी सोडण्याचा विषय असू देत किंवा जळालेले ट्रान्सफर शेतकऱ्यांना बदलून देण्याचे विषय असू देत. दादांना याबाबत मागणी केली असता तातडीने हे प्रश्न सोडवले जात होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मी जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हतो. उमेदवारीच्या चर्चे वेळी दादांनी विचारले अरे प्रकाश पवार यांच्या कुटुंबातील कुणीही उभे नाही का? यानंतर दादांनी वंदना पवार यांना पंचायत समिती निवडणूक लढविण्याचे आदेश दिले. त्यांचे आदेश आशीर्वाद मानून पंचायत समिती लढविण्यासाठी तयारी केली.

दादांची ओळख ही कामाचा माणूस म्हणून होती.त्यांच्या या कार्याचाच वसा आम्ही जातेगाव चे पवार कुटुंब पुढे चालवणार आहोत. दादा आणि घड्याळ हे आतापर्यंत एक गुढ होते. दादांना श्रद्धांजली द्यायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले व केंदूर पंचायत समिती गणातील उमेदवार सुचिता थिटे यांच्या घड्याळाच्या चिन्हाला मतदान करणे हीच खरी श्रद्धांजली राहील जेणेकरून हे सर्व उमेदवार दादांच्या विकास कामाचा वसा पुढे नेतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT