School Bus Pudhari
पुणे

School Bus CCTV Inspection: पुण्यात स्कूल बसमध्ये CCTV तपासणी मोहीम; 20 जूनपर्यंत माहिती अद्ययावत करण्याचे RTO चे आदेश

सर्व शाळांना पोर्टलवर बसची तपशीलवार माहिती भरणे बंधनकारक; मुदतीनंतर विशेष पथकांकडून भौतिक तपासणी व कडक कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहर, जिल्ह्यातील सर्व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत की नाही आणि ते चालू स्थितीत आहेत का, याची थेट भौतिक पाहणी ‘आरटीओ’च्या विशेष पथकांद्वारे आता केली जाणार आहे. आपल्या शाळेतील स्कूल बसची संपूर्ण माहिती आरटीओच्या अधिकृत पोर्टलवर अद्ययावत करण्यासाठी २० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे, असे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी सर्व शाळा प्रशासनाला दिले आहेत.

महाराष्ट्र स्कूल बस नियमावली २०११ आणि पुणे जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या निर्णयानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. http:///schoolbussafe typune.org या आरटीओच्या अधिकृत संकेतस्थळावर शाळा आणि बस व्यवस्थापकांना लॉगिन करून आणि त्यामधील माहिती भरून अद्ययावत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या पोर्टलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन रकाने समाविष्ट करण्यात आले असून, त्यामध्ये शाळेच्या मालकीच्या किंवा करारावरील एकूण बसची संख्या, प्रत्येक वैयक्तिक बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे की नाही आणि तो सध्या सुरू स्थितीत आहे का, याची अचूक माहिती देणे बंधनकारक आहे, असेही आदेश आरटीओ गायकवाड यांनी पत्राद्वारे शाळा प्रशासनाला दिले आहेत.

मुदतीनंतर होणार कडक कारवाई

दि. २० जून २०२६ या मुदतीनंतर आरटीओच्या विशेष पथकांद्वारे प्रत्यक्ष बसची तपासणी करून पोर्टलवरील माहितीची शहानिशा केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तांत्रिक अडचणींसाठी शाळांनी पुणे आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपीक दत्तात्रय गुंजकर (९४२३२६५९५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

शालेय वाहनांना या नियमांचे पालन बंधनकारक...

१) वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस), विमा, कर भरणा आणि पीयूसी व अन्य कागदपत्रे वैध असावीत.

२) बसचालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स व बिल्ला असणे आवश्यक आहे.

३) सर्व शालेय बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुरू स्थितीत असावेत व प्रत्येक बसमध्ये महिला परिचारिका नियुक्त असावी.

४) स्कूल बसचालक व वाहकांची पोलिस पडताळणी झालेली असणे आवश्यक आहे.

५) १ ऑक्टोबर २०२३ नंतर उत्पादित सर्व बसमध्ये फायर अलार्म अँड प्रोटेक्शन सिस्‍टिम प्रणाली कार्यान्वित असावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT