Accident Survey Pudhari
पुणे

Pune RTO Black Spots: पुण्यातील ३० अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट्सची विशेष पाहणी; आरटीओकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

रस्ते सुरक्षेसाठी समन्वय वाढविण्याचा निर्णय; विंदा गुरावे यांच्याकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आरटीओच्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच ३० गंभीर अपघातप्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट्स) सखोल पाहणी करण्यासाठी ब्लॅकस्पॉट निहाय विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, संबंधित सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी आणि येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही मोहीम फक्त परिवहन विभागापुरती मर्यादित नसून, यात अनेक महत्त्वाच्या यंत्रणा एकत्र आल्या आहेत. यात परिवहन विभाग, पुणे पोलिस (ग्रामीण व शहर वाहतूक शाखा), रस्ते बांधणी यंत्रणा, आंतरराष्ट्रीय संस्था आणि इतर संबंधित स्वयंसेवी संस्था यांचा सक्रिय सहभाग असणार आहे.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि शहर वाहतूक विभागाने नमूद केलेल्या रस्ते व अपघातप्रवण क्षेत्रांचीही याअंतर्गत काटेकोर तपासणी केली जाणार आहे. रस्ते रचनेतील त्रुटी, अपुरे गतिरोधक, दिशादर्शकांचा अभाव यांसारख्या तांत्रिक कारणांचा शोध घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना सुचवणे हा या पाहणीचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेत अनेक शासकीय आणि निमशासकीय विभागांचा समावेश असल्याने कामात सुसूत्रता राहावी, यासाठी विंदा गुरावे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असे जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT