Baramati Pandharpur Wari ST Bus Service: आषाढी वारीसाठी बारामती एसटीची विशेष बससेवा; गावातून थेट पंढरपूर

४० जणांच्या समूह आरक्षणावर थेट गावातून बस, वारकऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा
St Bus
St BusPudhari File Photo
Published on
Updated on

बारामती: आषाढी वारी तोंडावर आल्याने प्रवाशांसाठी एसटीने खास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वारीच्या काळात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अधिक असते. त्यानुसार महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळा(एसटी)ने तयारी केली आहे.

St Bus
Illegal Sex Determination Racket: दौंडमध्ये गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; डॉक्टर व एजंटला अटक

वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता बारामती बस आगाराकडूनही पंढरपूरसाठी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 40 प्रवाशांनी एकत्रित आरक्षण केल्यास थेट गावात गाडी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी दिली.

St Bus
Pune Nazare Dam Water Crisis: नाझरे धरणात पाणी शून्यावर; पुरंदर तालुक्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट

वारकऱ्यांना असुविधा जाणवू नये, यासाठी बारामती आगाराने एसटी विभागाकडून जादाच्या गाड्या मागविल्या आहेत. आषाढी वारीसाठी एसटी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पंढरपूरला एसटी महामंडळाच्या बसने जाणाऱ्या वारकऱ्यांना बसची कमतरता भासणार नाही.

St Bus
Pabe Ghat Bus Accident: पाबे घाटात भीषण बस अपघात; 2 ठार, 19 जखमी, राजगड तालुक्यात हळहळ

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी अगोदर एसटी विभागाशी संपर्क साधून एसटी बुकिंग करावी, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाने ग्रुप आरक्षणाची सुविधा दिली आहे. एकाच गावातील ४० जणांच्या समूहाने आरक्षण केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्यात येणार आहे.

St Bus
Illegal Hill Cutting: अगळंबे परिसरात अवैध डोंगरफोड; खडकवासला धरणाला गाळ व दरडींचा धोका

या लोकांना घेण्यासाठी एसटी गावात जाईल. शिवाय दर्शन झाल्यावर पंढरपूर तेथून पुन्हा त्यांच्या गावी सोडेल. यामुळे प्रवाशांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटीने उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news