खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : शिवापूर (ता.हवेली) या गावातील शिवापूर वाडा येथील श्री गणेश ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर तीन जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. या दुकानाशेजारील असलेल्या सलून दुकानावर देखील हल्ला केल्याची घटना घडली. राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा काम सुरू केला.
शिवापूर वाडा येथे रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास श्री. गणेश ज्वेलर्स या दुकानामध्ये तीघेजण घुसले. त्यांनी पिस्तुल दाखवून ज्वेलर्स मधील दोघा जणांना 'बाजू हटीये' असे म्हणून काऊंटरवरील पाच सोन्याचे डबे घेऊन दुचाकीवर पलायन केले. दरम्यान दुकानाच्या काचा फोडत शेजारी असलेल्या सलुनच्या दुकानातही त्यांनी गोळीबार केला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांना ठिकठिकाणी पथके रवाना केली. या दरोड्यामध्ये एकूण सहा जण आरोपी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान भोरचे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी पाहणी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वानपथकला पाचारण केले असून महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची पथके रवाना केली आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे अश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा