Pune Ring Road Project Pudhari
पुणे

Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्प 25 टक्के पूर्ण; वाहतूक कोंडीला दिलासा

प्रमुख महामार्गांना जोडणी; शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि विकासाला चालना मिळणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे रिंगरोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, सुमारे 25 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसी अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. पुण्याच्या रिंगरोडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासंदर्भात शासनाकडून देखील वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, भविष्यात पुण्याच्या वाहतूकव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर रिंगरोड प्रकल्पामुळे शहराबाहेरील वाहतूक थेट वळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील ताण कमी होऊन प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल.

या रिंगरोडमुळे पुणे जिल्ह्यातील विविध तालुके तसेच औद्योगिक क्षेत्रे एकमेकांशी अधिक प्रभावीपणे जोडली जाणार आहेत. विशेषतः मुंबई-बंगळुरू महामार्ग, नगर रोड, सोलापूर रोड यांसारख्या प्रमुख मार्गांना जोडणारी ही रिंगरोड कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करणार आहे. त्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासीवाहतूक दोन्हीमध्ये वेळेची बचत होणार आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी प्रशासनाने गती वाढवली असून, येत्या काही वर्षांत संपूर्ण रिंगरोड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूणच, पुणे रिंगरोड हा प्रकल्प शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पुणे रिंगरोड महत्त्वाचे मुद्दे

  • सध्या प्रकल्पाचे सुमारे 25 टक्के काम पूर्ण

  • वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा प्रकल्प

  • बाहेरील (हायवे) वाहतूक शहरात न येता थेट वळवता येणार

  • प्रवासाचा वेळ आणि इंधनखर्च कमी होणार

  • कनेक्टिव्हिटीसंदर्भात मुंबई-बंगळुरू महामार्ग, नगर रोड, सोलापूर रोड यांसारख्या प्रमुख मार्गांना थेट जोडणी

  • जिल्ह्यातील तालुके, औद्योगिक क्षेत्रे एकमेकांशी अधिक जवळ येणार

  • मालवाहतूक जलद, सुलभ होणार

  • विकासाच्या दृष्टीने उपनगर आणि ग््राामीण भागात नवीन विकासाच्या संधी

  • औद्योगिक गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता

  • रिअल इस्टेट क्षेत्राला चालना

  • रोजगारनिर्मितीला मदत

रिंगरोडच्या उभारणीमुळे शहराच्या उपनगरांमध्ये आणि ग््राामीण भागात विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. औद्योगिक गुंतवणूक वाढण्यास चालना मिळेल तसेच रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे रोजगारनिर्मितीस हातभार लागणार आहे. काम गतीने सुरू आहे. कमीत कमी वेळेत हा प्रकल्प पूर्ण करणे आमचा प्रयत्न आहे.
राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT