Pune Gas Shortage: गॅस टंचाईत जुन्या स्टोव्हच्या आठवणींना उजाळा; पुणेकरांचा भावनिक अनुभव

युद्धजन्य परिस्थितीत गॅस संकटामुळे पितळी स्टोव्हच्या आठवणी पुन्हा जाग्या; ज्येष्ठ गृहिणींचा अनुभव चर्चेत
Stove
StovePudhari
Published on
Updated on

पुणे: युद्धामुळे स्टोव्हची ‌‘पिन‌’ पुन्हा टोचली, ही सद्य:स्थिती सांगणारी ‌‘पुढारी‌’ची बातमी वाचताच एका ज्येष्ठ पुणेकर गृहिणीने ‌‘पुढारी‌’ला फोन करीत 1965 साली सुरू झालेल्या संसाराच्या आठवणी जागवल्या. त्या वेळी 8 बाय 10 च्या खोलीत संसाराला झालेली सुरुवात अन्‌‍ नवऱ्याच्या मेहनतीच्या कमाईने तुळशीबागेतून घेतलेला पहिला पितळी स्टोव्ह, अशा अनेक रंजक जुन्या आठवणी त्यांनी दै. ‌‘पुढारी‌’च्या प्रतिनिधीशी बोलताना जागवल्या.

Stove
Pune Gas Cylinder Supply: पुण्यात गॅसपुरवठा पूर्वपदावर; 83 हजार सिलिंडरचे वितरण

अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाने आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे गणित बिघडवले असले, तरी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी या बातमीने 60 वर्षांपूर्वीच्या आठवणींना वाचा फोडली आहे. गॅसटंचाईमुळे अडगळीतील स्टोव्ह पुन्हा बाहेर येत असतानाच 1965 च्या काळातील 27 रुपयांच्या त्या पितळी स्टोव्हने सुरू झालेल्या संसाराची कहाणी आशा शिंदे ह्या ज्येष्ठ गृहिणीने सांगितली.

Stove
Pune Nashik Highway Accident: मंचरजवळ भीषण अपघात; पिंपरीतील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

त्यांच्यासह अनेक पुणेकरांच्या आठवणींना पुन्हा येणाऱ्या स्टोव्हच्या बातमीने उजाळा मिळाला आहे. बातमी वाचल्यावर रविवारी (दि. 22) अनेक ज्येष्ठांनी बातमीचे कौतुक करीत त्यांच्या स्टोव्हने सुरू झालेल्या संसाराच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.

Stove
Pune University RUSA Fund: पुणे विद्यापीठात रुसा निधी वाद; 62 कोटी खर्च न झाल्याने प्रश्नचिन्ह

नव्या संसारात पहिला चहा केला 27 रुपयांच्या स्टोव्हवर

पुण्यातील ज्येष्ठ गृहिणी आशा शिंदे म्हणाल्या, दै. ‌‘पुढारी‌’तील बातमी वाचली अन्‌‍ मन थेट 1965 सालात गेले. त्या वेळी नुकतेच लग्न झाले होते. माझे मिस्टर दत्ताजी क्रीडा साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत. त्या वेळी रॅकेटला कटिंग केल्याचे तेव्हा 30 रुपये मिळाले, त्यांनी ते माझ्या हातात ठेवले आणि म्हणाले, तुला हवे ते घे. घरात स्वयंपाकासाठी स्टोव्ह लागणार होता. मी तडक तुळशीबागेत गेले अन्‌‍ 27 रुपयांचा पितळी स्टोव्ह विकत घेतला. पुढे रामेश्वर चौकात 8 बाय 10 ची खोली मिळाली आणि त्याच स्टोव्हवर पहिला चहा केला. रॉकेलसाठी भंगारवाल्याकडून 10 पैशांची रिकामी बाटली आणल्याचे आजही आठवते.

Stove
Pune Sports School Announcement: महाराष्ट्र केसरीत क्रीडा शाळांची घोषणा; दादा भुसे यांचे वक्तव्य

आज गॅस सिलिंडरसाठी हजारो रुपये मोजावे लागतात. बुकिंगच्या रांगा लावाव्या लागतात; पण युद्धाच्या संकटात पुन्हा एकदा तोच जुना मित्र (स्टोव्ह) आठवला. आज तो स्टोव्ह जवळ नसला, तरी या ‌‘पुढारी‌’च्या बातमीने त्या पितळी चकाकीच्या आणि संघर्षाच्या दिवसांची आठवण ताजी केली. खरोखर परिस्थिती बदलली तरी आठवणींचा तो पिन आजही मनात तितकाच खोलवर टोचतो.

आशा शिंदे, एक वाचक, ज्येष्ठ गृहिणी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news