Rain Pudhari
पुणे

Pune Rainfall Record 2026: पुण्यात पावसाचा ५७ वर्षांचा विक्रम; जुलैची महिनाभराची सरासरी अवघ्या आठ दिवसांत पार

१ ते ८ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा तडाखा; शहरात ३५७ मिमी पाऊस, चिंचवडमध्ये सर्वाधिक २९५ टक्के नोंद

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात १ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीने बहार आणली आहे. अवघ्या आठच दिवसांत महिन्याची सरासरी गाठली आहे. शहरात ११ जुलैअखेर एकूण ३५७ मिलिमीटर पाऊस झाला असून, त्याची टक्केवारी १९४.२ इतकी नोंदली गेली. सर्वाधिक पाऊस चिंचवड भागात तब्बल २९५ टक्के झाला आहे.

जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने पुणेकर हैराण होते. अल-निनोच्या चर्चेने तर आणखीनच घाबरवून सोडले होते. शेवटी जूनअखेर म्हणजे २४ ते ३० जूनदरम्यान फक्त ३६ मि. मी. पाऊस झाला. जुलैची सुरुवात मात्र अतिवृष्टीने झाली. १ जुलै रोजी दमदार पाऊस झाला. त्यानंतर २ ते ८ जुलै या सातच दिवसांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणीमातेचे पोट भरले. भिज पावसामुळे जमिनीचा जलस्तर वाढला. पर्वतरांगा हिरव्यागार झाल्या अन्‌ धरणांत ५१ टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट दूर झाले.

यंदाच्या पावसाची वैशिष्ट्ये...

  • १९६९ नंतर जुलैमधील सर्वाधिक पाऊस

  • तब्बल ५७ वर्षांनी जुलैमध्ये इतका पाऊस झाला

  • जुलैच्या पहिल्याच आठवड्याने गाठली संपूर्ण महिन्याची सरासरी

  • शहरात पावसाचे असमान वितरण

  • चिंचवड-कोथरूड परिसरात अतिवृष्टी

  • सलग आठ दिवस मुसळधार

  • खडकवासला धरणसाखळीत मोठी आवक

  • झाडपडीच्या २०० पेक्षा जास्त घटना

  • अनेक घरांत शिरले पाणी, दोन दिवस शाळांना सुटी

आता पुढे काय होणार?

  • १२ ते १५ जुलैदरम्यान अत्यंत हलका पाऊस

  • १६-१७ जुलै रोजी काही भागांत जास्त मध्यम पाऊस

अतिवृष्टीची शक्यता मात्र कमी

जुलैमधील शहराच्या पावसाचे विक्रम

  • १९६१ : अतिवृष्टी, १९६९ : अतिमुसळदार

  • १९९४ : सरासरीपेक्षा जास्त, २००५ ओला दुष्काळ

  • २०१९ : सर्वाधिक पाऊस मासिक सरासरीपेक्षा जास्त

  • २०२५ : २५ जुलैपर्यंत ३३७ मी.मी, २४ तासांत ११४ मि. मी.

  • २०२६ : १ ते ८ जुलैमध्ये ५७ वर्षांचा विक्रम मोडला, महिन्याची सरासरी आठ दिवसांत पार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT