Pune Market Yard Vegetable Rates: पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली; भेंडी, गवार, फ्लॉवरसह पालेभाज्यांचे दर तेजीत

पावसामुळे रखडलेली तोड आणि पालखी मुक्कामानंतर बाजारात ११० ट्रक माल दाखल; कोथिंबीर, मेथी, पालकाच्या दरात १० ते २० टक्क्यांची वाढ
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: पावसाने रखडलेली तोड, पालख्यांच्या दोन दिवसांच्या मुक्कामामुळे किरकोळ विक्रेत्यांनी फिरविलेली पाठ आणि शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे रविवारी मार्केट यार्डात फळभाज्यांची मोठी आवक झाली. घाऊक बाजारात राज्यासह परराज्यांतून सुमारे १०० ते ११० ट्रक फळभाज्या दाखल झाल्या. मागील आठवड्याच्या तुलनेत आवकेत दहा ते वीस ट्रक्रने वाढ झाली. पालखीमुळे काही दिवस कमी प्रमाणात खरेदी करणारे किरकोळ विक्रेते रविवारी मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाल्याने मालाला चांगला उठाव मिळाला.

Vegetable
Pune Fruit Market Pomegranate Price: पुणे फळबाजारात डाळिंबाला ‘लाल’ झळाळी; मागणी वाढल्याने दरात १० टक्क्यांची वाढ

बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने भेंडी, गवार, फ्लॉवर, घेवडा, भुईमूग शेंग आणि मटारच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, आवक वाढल्याने हिरवी मिरची आणि काकडीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. इतर सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

Vegetable
Pune Market Yard Jaggery Price: पुणे मार्केट यार्डमध्ये गुळाचे दर तेजीत; श्रावणामुळे मागणी वाढण्याची शक्यता, उडीद डाळही महागली

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात येथून हिरवी मिरची १८ ते २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथून घेवडा ३ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमुग शेंग १ टेम्पो, इंदौर येथून गाजर ९ ते १० टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी २ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार २०० गोणी, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ७ ते ८ टेम्पो, इंदौर, आग्रा, आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा ४५ टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Chakan Market Yard Vegetable Rates: चाकण बाजारात भाजीपाल्याची विक्रमी आवक; ५ कोटी ६० लाखांची उलाढाल, मिरची-भेंडीसह फळभाज्यांना तेजीत भाव

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ५५० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेटस, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, कांदा सुमारे १२५ टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Pune Fish Market Price Hike: वादळाचा मासळी बाजारावर परिणाम; पुण्यात मासळीचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले

कोथिंबीर, मेथी, शेपू , कांदापात, पालक महागले

पावसामुळे पुणे विभागात पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी मार्केट यार्डातील पालेभाज्यांची आवक घटली असून दर्जेदार मालाचे प्रमाणही कमी झाले आहे. ग्राहकांकडून दर्जेदार मालाला चांगली मागणी असल्याने कोथिंबीर, मेथी, कांदापात, शेपू आणि पालक यांच्या दरात शेकडा जुडीमागे दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी (दि. १२) घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या सुमारे ८० हजार जुड्या, तर मेथीच्या ४० हजार जुड्यांची आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी होती. कोथिंबिरीच्या जुडीला दर्जानुसार २० ते ४० रुपये घाऊक दर मिळाला. मात्र मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने इतर पालेभाज्यांचे दर स्थिर राहिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news