Maharashtra Rain Update Pudhari
पुणे

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; घाटमाथ्यावर अतिमुसळधार, दोन दिवस ऑरेंज अलर्ट

सलग पाचव्या दिवशी पावसाची हजेरी; पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात ३० जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी मुसळधार ते हलक्या पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस सुरूच असून, आगामी दोन दिवस तेथे मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून चांगला पाऊस सुरू असून, ३० जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बुधवार, गुरुवारी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. शुक्रवारी पाऊस कमी होईल असे वाटत होते. कारण दुपारपर्यंत बहुतांश भागात कडक ऊन पडल्याने पाऊस दिवसभर उघडीप देईल असे वाटत होते. मात्र, दुपारी ४.३० नंतर पावसाला सुरुवात झाली.

शुक्रवारी जिल्ह्यात झालेला पाऊस

कुरवंडे ७७.५, गिरीवन ६४.५, भोर २५,तळेगाव २५, चिंचवड २२, माळीण ११, एनडीए ९.५, पाषाण ७.६, डुडुळगाव ७.५, दापोडी ७, शिरूर ६, बालेवाडी ४.५, राजगुरुनगर ४.५, शिवाजीनगर ४.४, निमगिरी ४, हडपसर २.५, कोरेगाव पार्क १.५, दौंड ०.५, बारामती ०.२

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT