Pune Railway Station Pudhari
पुणे

Illegal Vendors Railway Station: पुणे रेल्वेस्थानकावर अवैध विक्रेत्यांवर कारवाई; २७ जणांना दंड, ४२० पाण्याच्या बाटल्या जप्त

मध्य रेल्वे पुणे विभागाची विशेष मोहीम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत विक्रीवर आळा घालण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

​पुणे: रेल्वेस्थानक परिसर आणि गाड्यांमधील अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एक विशेष तपासणी मोहीम राबवली. रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने वाणिज्य विभागाने केलेल्या या कारवाईमध्ये २७ अनधिकृत फेरीवाल्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

​विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेल्या विक्रेत्यांवर रेल्वे कायद्याच्या कलम १४४ आणि 'जन विश्वास कायदा, २०२६' अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी २,००० रुपयांप्रमाणे एकूण ५४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी अधिकृत रेल्वे स्टॉल्स किंवा मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. तसेच, स्थानकावर कोणताही अनधिकृत विक्रेता आढळल्यास त्याची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी. स्थानकावर स्वच्छता, सुरक्षितता आणि शिस्त राखण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही सातत्याने राबवल्या जातील, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.

अप्रमाणित पॅकेज्ड पाण्याच्या ४२० बाटल्या जप्त

या मोहिमेदरम्यान पुणे रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वरून रेल्वे प्रशासनाने अप्रमाणित पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याची ३५ खोकी म्हणजेच ४२० बाटल्या असलेली ट्रॉली जप्त केली. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये व त्यांना मान्यताप्राप्त उत्पादनेच मिळावीत, यासाठी ही जप्ती करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT