Radhamoha Mishra Pudhari
पुणे

Pune Radhamoha Mishra Case: पुणे भोंदू राधामोहन मिश्रा प्रकरण: हरियाणात तपास; लॅपटॉप पासवर्डमुळे चौकशी अडचणीत

पोलिस कोठडी वाढली; मॉडर्न गुरुकुल आश्रम प्रकरणात डिजिटल पुराव्यांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: ईश्वराचा अवतार असल्याचे सांगून तरुणीवर अमानुषपणे लैंकिग अत्याचार करणारा भोंदू राधामोहन मिश्रा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने आपले बस्तान पुण्यात येण्याअगोदर हरियाणातील पंचकुला येथे बसवले होते. तेथे त्याने मॉडर्न गुरुकुलच्या नावाखाली आश्रम स्थापन केले होते. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आता हरियाणात जाऊन मिश्राची कुंडली तपासणार आहेत. दरम्यान, पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर मिश्रा आणि त्याच्या सहकारी महिला आरोपींना शनिवारी (दि. 20 जून) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. गिरम यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात अटक केलेल्या राधामोहन मिश्रा, त्याचा सहकारी स्वामी कंवल नयन यांच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधील पुरावे मिळवायचे आहेत, मात्र आरोपीकडून लॅपटॉपचा पासवर्ड मिळत नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील कल्पना झोरे म्हणाल्या की, मिश्राने फिर्यादीला अश्लील फोटो व व्हिडीओ दाखवून बलाकार केला असून, त्याच्याकडे या अनुषंगाने तपास केला असता त्याने सहकार्य केलेले नाही.

गुन्ह्यात जप्त केलेली जिवंत काडतुसे ही कोणत्या गनमधील आहेत, तसेच ते कोठे लपवून ठेवले आहे, ही काडतुसे कोणी पुरवली याबाबत आरोपीकडे तपास केला. परंतु, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी ॲड. झोरे यांनी केली.

दरम्यान, आरोपी महिलांना बेकायदेशीरपणे अटक केली असल्यामुळे त्यांना जामीन मिळण्याचे स्वातंत्र्य आहे. या निकषावर महिला आरोपींनी शुक्रवारी (दि. १९) ॲड. गणेश गुप्ता आणि ॲड. सलमान पठाण यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. या पिटीशन संबंधी तपास यंत्रणेने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. २२) होणार आहे.

राधामोहन मिश्राला गंभीर आजार

राधामोहन मिश्राला गंभीर आजार असून, या आजारात एकेक अवयव निकामी होतात. यावर त्याची सहा महिन्यांपासून औषधे सुरू आहेत. या आजारासाठी त्याला इंजेक्शन घ्यावे लागते. त्यामुळे त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी बचाव पक्षाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT