DJ Free Dahi Handi pudhari
पुणे

DJ Free Dahi Handi: पुनीत बालन ग्रुपच्या डीजेमुक्त दहीहंडीचा यंदाही जल्लोष; लाल महाल चौकात सार्वजनिक गणेश मंडळांची संयुक्त दहीहंडी

Anirudha Sankpal

DJ Free Dahi Handi: पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणत पुनीत बालन ग्रुपच्या वतीने यंदाही डीजेमुक्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे, हलगी-मर्दानी खेळ आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी ही माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल महाल चौकात संयुक्त दहीहंडी सोहळा थोड्याच वेळात रंगणार आहे. पुनीत बालन ग्रुपने दोन वर्षांपासून संयुक्त दहीहंडी उत्सव सुरु केला आहे. तर गतवर्षी डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन करून महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक डीजेमुक्त दहीहंडी साजरी केली होती.

त्यानंतर डीजेमुक्त दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्याची भूमिका ग्रुपने सातत्याने घेतली आहे. या उपक्रमाला यंदा व्यापक प्रतिसाद मिळत असून यावर्षी तब्बल 31 गणेश मंडळे या सयुंक्त दहीहंडीत सहभागी होत आहेत.

कार्यक्रमाची सुरवात प्रभात बँडच्या वादनाने होत आहे. त्यानंतर मानवंदना होणार असून या कार्यक्रमांनंतर रमणबाग तेजस्विनी , पकवाज टाळ, शिवाद्य, गजर, हलगी वादन, मर्दानी खेळ, आवर्तन , समर्थ, शिवमुद्रा आणि अष्टविनायक या पथकांचे सादरीकरण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT