पुणे: दैनिक ‘पुढारी’वर प्रेम करणाऱ्या लाखो वाचकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दै. ‘पुढारी’च्या वर्धापन दिनाला हजेरी लावत दै. ‘पुढारी’वर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. वाचकांचे निस्सीम प्रेम आणि दृढ विश्वासाच्या बळावर दै. ‘पुढारी’चा 87 वा वर्धापन दिन शनिवारी दिमाखात साजरा झाला.
म्हात्रे पुलानजीकच्या डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्सच्या हिरवळीवर शनिवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. आकर्षक सजावट व रोषणाई केलेल्या या प्रांगणात मोठ्या पडद्यावर दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याची चित्रफीत दाखविण्यात आली. दै. ‘पुढारी’चा स्नेहमेळावा म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवरांसह आप्तेष्ट, मित्रांना भेटण्याचे हक्काचे ठिकाण. शनिवारच्या या सोहळ्यात अनेकांनी हस्तांदोलन करीत तर कोणी गळाभेट घेत शुभेच्छा देत दै. ‘पुढारी’वरील प्रेम व्यक्त केले. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला हा आनंद सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. रात्री आठच्या सुमारास संपूर्ण आवार गर्दीने फुलून गेले. व्यासपीठावर तर शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची रीघ लागली होती. वाचकांच्या आपुलकीने आणि प्रेमाने दै. ‘पुढारी’चा हा वर्धापन दिन अविस्मरणीय सोहळा ठरला.
उमेदवारांनी साधली प्रचाराची संधी
महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शनिवारी दै. ‘पुढारी’च्या वर्धापन दिनाला हजेरी लावत दै. ‘पुढारी’ला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उपस्थितांबरोबर संवाद साधत आपला व आपल्या पक्षाचा प्रचारही केला. डेक्कन-हॅपी कॉलनी (प्रभाग क्रमांक 35) प्रभागातील भाजपचे संपूर्ण पॅनेलच येथे आले होते. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारही आपल्या समर्थकांसह आल्या होत्या. इतर प्रभागातीलही अनेक उमेदवारांनी काल सायंकाळी जनसंपर्काची ही संधी साधली.
पूजा मोरेचे काय झाले?
फुलेनगर-नागपूरचाळ (प्रभाग क्रमांक 2) मधून भाजपची अधिकृत उमेदवारी मिळालेल्या पण, नंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेल्या पूजा मोरे-जाधव याही आपले पती धनंजय जाधव यांच्यासमवेत काल सायंकाळी दै. ‘पुढारी’स शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही भाजपचा प्रचाराचा स्कार्फ गळ्यात टाकून वावरणाऱ्या पूजा मोरेंबाबत उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता होती. अनेक जण त्यांच्याभोवती जमा होऊन त्यांच्या माघारी नाट्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसले.
आमदार, खासदार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी लावली हजेरी
डॉ. नीलम गोऱ्हे, दत्तात्रय भरणे, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर, हेमंत रासने, शंकर मांडेकर, हर्षवर्धन पाटील, मोहन जोशी, रशिद शेख, संगीता तिवारी, शिवा मंत्री, गणेश सातपुते, ॲड, अभय छाजेड, विशाल तांबे, अप्पा रेणुसे, तात्या भितांडे, बाळासाहेब अमराळे, विरेंद्र किराड, ॲड. दिलीप जगताप, गोपाळ तिवारी, गोपाल चिंतल, बाळासाहेब दाभेकर, मुकुंद किर्दत, सौरभ अमराळे, निरंजन दाभेकर, डॉ. सुनीता मोरे, पुजा मोरे-जाधव, धनंजय जाधव, शैलेश राजगुरू, पुनीत जोशी, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, सुनील पांडे, सुषमा ढोकले, संतोष शिंदे, रोहन सुरवसे, तनवीर पाटील, प्रथमेश आबनावे, पृथ्वीराज पाटील, सुनिल माने, गिरीश खत्री, चंद्रशेखर कपोते, डॉ. तेजस्विनी गोळे, दिलीप लिंबळे, आनंदराव पाटील, भगवान कडू-पाटील, अजिंक्य पालकर, माधवराव डोईफोडे, गणेश करमाळकर, रमेश जाधव, नितीन दांगट, अमोल काळे, युवराज दिसले, सुरेश कांबळे, चेतन आगरवाल, राजाराम माताळे, बाजीराव पारगे, मोहम्मद शेख, मिर्झा अहमद बेग, महेश विचारे, विक्रम मेमाणे, राजेंद्र कपोते, महेंद्र कांबळे, मोहन बागमार, भीमराव पाटोळे, बाप्पुसाहेब भोसले, केतकी कुलकर्णी, संघदीप शेलार, डॉ. राहुल भोसले, शंकर शिंदे, सुरेश पंकड, विष्णू तापकीर, सुजाता दगडे, कमलाकर शेटे, नरेंद्र दरवडे, प्रकाश बर्गे, सुरेखा दमिष्टे, निलेश दमिष्टे प्राजक्ता दांगट, अशोक कदम, बाजीराव मासाळ, सागर कांबळे, रोहन पायगुडे, गणेश पासलकर, आप्पा जाधव, पूजा मोरे, धनंजय जाधव, प्रा. मामासाहेब भोसले, शिवा मंत्री, लक्ष्मण माताळे, नरेंद्र शिंदेकर, संजय शंखे, श्वेता ओतारी, राहूल डंबाळे, दिलीप शेलार, श्रीकांत सातपुते, दादासाहेब सांगळे, हेमंत येवलेकर, शंकरराव शिंदे, विठ्ठल ठाकर, शैलेश आवळे, प्रकाश वैराळ, केतकी कुलकर्णी, विजयकुमार मर्लेचा, राहुल मगर, राजाभाऊ मगर, पुष्पक कांदळकर, रोहित कांबळे, योगेश वराडे, लखन वाघमारे, मीनाक्षी कुलकर्णी, सचिन पायगुडे, उमेश कंधारे, शीतल पायगुडे, ॲड. परेश सातपुते, राहुल मगर, राजाभाऊ मगर, तेजस भालेराव, प्रकाश बाफना, दिलीप लिंबळे.