Rakhi Pudhari
पुणे

Pune Post Office Rakhi Service: रक्षाबंधनासाठी पुणे टपाल विभागाची खास भेट; ‘वनस्टॉप राखी सोल्यूशन’मुळे राखी पोहोचणार देश-विदेशात

राखी, भेटवस्तू, सुरक्षित पॅकिंग आणि आंतरराष्ट्रीय पार्सल सुविधा एकाच छताखाली; परदेशासाठी मोफत पिकअप सेवाही उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

पुणे: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचा पवित्र सण अधिक आनंददायी करण्यासाठी पुणे टपाल क्षेत्राने 'वनस्टॉप राखी सोल्यूशन' या विशेष उपक्रमाची सुरुवात केली आहे.

या उपक्रमामुळे राखी पाठविण्यापासून ते भेटवस्तू आणि शुभेच्छा देशभरात तसेच जगभरातील प्रियजनांपर्यंत सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहचविण्याच्या सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

राखी, भेटवस्तू आणि आंतरराष्ट्रीय पार्सलची सोय रक्षाबंधनाच्या काळात राखी आणि भेटवस्तू वेळेत व सुरक्षितपणे पोहचणे प्रत्येक भावंडासाठी महत्त्वाचे असते. ही गरज लक्षात घेऊन पुणे टपाल विभागाने विशेष राखी लिफाफे, सुरक्षित पॅकिंग, स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय पार्सलसेवा आणि ग्राहकाभिमुख विविध सुविधा सुरू केल्या आहेत. त्यामुळे देशात किंवा परदेशात राहणार्‍या भावंडांना राखी पाठविणे आता अधिक सोपे, सुरक्षित आणि विश्वासार्ह झाले आहे.

इथे साधा संपर्क

परदेशात राखी पाठविण्यासाठी मोफत पिकअप सुविधा उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी संदीप बटवाल 7028007234, साई पाटील 9673167178, ज्ञानेश्वर अंबुरे 983448 2105, लहू लोहोकरे 9404963081 या अधिकार्‍यांशी संपर्क साधता येणार आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये सर्व सेवा एकाच छताखाली रक्षाबंधन हा केवळ सण नसून भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि भावनिक नात्यांचा उत्सव आहे. 'वनस्टॉप राखी सोल्यूशन'मुळे नागरिकांना त्यांनी खरेदी केलेली राखी सुरक्षितपणे भावापर्यंत पोहचविण्यापासून ते भेटवस्तू किंवा खाऊ पार्सलने पाठविण्यापर्यंत सर्व सुविधा पोस्ट ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहेत. परदेशात राखी पाठविणार्‍या ग्राहकांसाठी घरबसल्या मोफत पार्सल पिकअप सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज उरत नाही. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
प्रीती अग्रवाल, पोस्टमास्टर जनरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT