पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यात रविवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाने कल्याणनगर येथे आपल्या अलिशान गाडीने दोघांना चिरडले. यात आयटी अभियंता असलेले तरुण व तरुणी जागीच ठार झाले. या घटनेनंतर विविध स्तरातून तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. अमृता फडणवीस यांनी आपल्या 'X' अकाउंट पोस्ट करत म्हटलं आहे, " आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे."
पुणे येथे आलिशाने गाडीने अभियंता तरुण-तरुणीला चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत अश्विनी कोस्टा व अनिस अवधिया दोघेही मध्य प्रदेशचे आहेत. आरोपी संशयित अल्पवयीन आहे. तो पुण्यातील प्रख्यात बिल्डर विशाल यांचा मुलगा आहे. दरम्यान त्याला १४ तासात जामिन मिळाला. यावरून विविध स्तरातून तीव्र भावना व्यक्त केल्या जावू लागल्या. न्याय मंडळाच्या भूमिकेवर आरोप-प्रत्यारोप होवू लागले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या 'X' अकाउंटवर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्याबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना. दोषीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. बाल न्याय मंडळाची लाज वाटते!
दरम्यान, पुणे आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार (दि.२१) पत्रकार परिषद घेतली, यावेळी फडणवीस म्हणाले, पुणे येथील अपघातात एका तरुण अणि तरुणीचा झालेला मृत्यू ही घटना अस्वस्थ करणारी आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. आम्ही या घटेनची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दुर्लक्ष केलेले नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात योग्य कलमांचा वापर करण्यात आला आहे. मात्र बाल न्याय मंडळाचा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक होता.
या प्रकरणातील आरोपीचे वय १७ वर्ष ८ महिने इतके आहे. तरी त्याच्यावर प्रौढ म्हणून कारवाई करावी अशी मागणी बाल बाल न्याय मंडळाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हवाला देत आम्ही बाल न्याय मंडळाकडे पुन्हा याचिका दाखल केली आहे, पुढे बोलताना ते म्हणाले, अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणे हा गुन्हा आहे. . त्याचबरोबर अल्पवयीन मुलांना ज्यांनी दारु दिली त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बार, पब नियमांच पालन करतात का याची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले.
हेही वाचा