पुणे

Pune porsche accident : ‘माझा बाप बिल्डर असता तर..!’ युवक  काँग्रेसकडून निबंध स्पर्धा

Sonali Jadhav

पुणे : पुढारी वृत्तसेवा,  कल्याणीनगर येथील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने उपरोधिकपणे एका अनोख्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी 'माझा बाप बिल्डर असता तर…' यासह विविध विषय देण्यात येणार असून, या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. (Pune porsche accident)

युवक काँग्रेसकडून आज अनोखी निबंध स्पर्धा

या स्पर्धेसाठी 'माझा बाप बिल्डर असता तर…', माझी आवडती कार (पोर्शे, फरारी, मर्सिडिज), दारूचे दुष्परिणाम, मी खरंच पोलिस अधिकारी झालो तर…, अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? असे विषय स्पर्धकांना देण्यात येणार आहेत. स्पर्धेची वयोमर्यादा १७ वर्षे ते ५८ वर्षे आहे. ही स्पर्धा अपघात झालेल्या कल्याणीनगर येथील बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या दरम्यान घेतली जाणार आहे. Pune porsche accident

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT