पुणे : पुणे पोलिसांच्या परिमंडल पाचच्या हद्दीतून गहाळ झालेले 171 मोबाईल तक्रारदारांना नुकतेच परत करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
शहराच्या गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल चोरीला जाणे तसेच गहाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुणे पोलिसांच्या परिमंडल पाचच्या हद्दीतील नऊ पोलिस ठाणी आहेत. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले होते तसेच काही जणांचे मोबाईल गहाळ झाले होते. याबाबत पुणे पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाउंड’ पोर्टलवर तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला.
तांत्रिक तपासात हे मोबाईल संच दुसरे सीम कार्ड घालून वापरत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मोबाईल संच वापरणाऱ्यांशी संपर्क साधला आणि हे संच परत करण्याच्या सूचना दिल्या. मोबाऊल परत न दिल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. चोरीचे मोबाईल विकत घेऊन वापरणे हा गुन्हा असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. (पान 4 वर)
मोबाईल हरविल्यानंतर आम्ही अस्वस्थ झालो होतो. मोबाईल परत मिळेल की नाही, याची खात्री नव्हती. मोबाईलमध्ये महत्त्वाची माहिती होती. पोलिसांनी मोबाईल शोधले, याचे कौतुक वाटते. पोलिसांनी दिलेली ही अनोखी भेट आहे, अशी भावना तक्रारदारांनी व्यक्त केली.