Pune Bribery Case Pudhari
पुणे

Pune Bribery Case: पुण्यात लाचखोरीचे प्रकार सुरुच; दीड लाखांची लाच घेताना पोलिस कर्मचाऱ्याला अटक, आरोपीने तक्रारदाराचा घेतला चावा

Pune Police Bribery Case: पुण्याच्या पोलिस दलातील लाचखोरीच्या घटना वाढल्या असून गेल्या काही दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. कोरेगाव पार्कमधील पोलिस कर्मचारी गणेश कस्पटे याला ACB ने दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.

पुढारी वृत्तसेवा

Pune Police Bribery Case: पुणे शहरात पोलिस दलातील लाचखोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अवघ्या काही दिवसांत तीन पोलिस कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकले असून, यामुळे पोलिस यंत्रणेच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ताज्या घटनेत कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील गणेश कस्पटे या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. बोट क्लब परिसरात ही कारवाई करण्यात आली. कस्पटे हा तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडला गेला.

या कारवाईदरम्यान आरोपीने आक्रमक वर्तन करत तक्रारदारालाच चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही, तर ACB च्या अधिकाऱ्यांनाही त्याने धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे प्रकरण तापले आहे.

गेल्या 1 मेपासून बुधवारपर्यंत पोलिस दलातील दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला लाचखोरीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पुण्यातील पोलिस दलात शिस्त आणि पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असून, आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असे ACB कडून सांगण्यात आले आहे. नागरिकांकडूनही अशा प्रकरणांवर कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT